“मुलींवर संस्कार केल्यास बलात्कार थांबतील” ; भाजप नेत्याच्या वक्तव्यावरून सिनेस्टार्स संतापले

उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये एका मुलीवर सामुहिक बलात्कार झाला. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत. सर्वच स्तरातील लोकांकडून या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे.  हाथरस घटनेनंतरही उत्तर प्रदेशातून अनेक लाजिरवाण्या घटना समोर येत आहेत. आता उत्तर प्रदेशच्या एका भाजप आमदाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावर अभिनेत्री क्रिती सेनन आणि स्वरा भास्करने आक्षेप घेतला आहे.

“अशा घटना तलवारीने आणि शासन रोखू शकत नाही. पण या घटना चांगल्या संस्काराने रोखल्या जाऊ शकतात. सर्व पालकांनी आपल्या मुलीला चांगले संस्कार शिकवले पाहिजे. कोणत्याही सरकार आणि संस्काराच्या मिश्रणानेच देश सूंदर बनू शकतो”, असं उत्तर प्रदेशचे बलियाचे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी सांगितले.

“हा पापी माणूस आहे. भाजप आमदार सुरेंद्र सिंह रेपला डिफेंड करतो’, असं ट्वीट अभिनेत्री स्वरा भास्करने केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.