कोल्हापूरात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ ; रुग्णाची संख्या 378 वर

ातील प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोल्हापुरात दिवसभरात 37 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर काल एका दिवशी 55 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर गेल्या दहा दिवसात कोल्हापुरात 347 रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला

कोल्हापूर जिल्ह्यात काल एका दिवशी 55 नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे चिंतेत असतानाच आज पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेला धक्का बसला. कोल्हापुरात आज 37 रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 378 वर पोहोचला आहे.

औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 651 वर

कोल्हापुरातील वाढलेले सर्व रुग्ण हे रेड झोनमधून आलेले आहे. त्यामुळे रुग्णांची वाढ ही झपाट्याने होत असल्याने नागरिकांची काळजी वाढली आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.