‘बचपन का प्यार’ फेम सहदेवला रॅपर बादशाहकडून भेटीचे निमंत्रण!

मुंबई : सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात एक शाळेचा गणवेश घातलेला मुलगा ‘जाने मेरी जानेमन बचपन का प्यार’ गाणं गाताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर बादशाह याने व्हिडीओतील मुलाला भेटीचं निमंत्रण दिलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओचा ओरिजनल व्हिडीओ दोन वर्षांपूर्वी युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. ज्यात एक मुलगा त्याच्या शिक्षकांसमोर ‘बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे’ गाताना दिसतोय. सहदेवने गायलेल्या गाण्याला इन्स्टाग्रामवर 12 हजाराहून अधिक रील्स बनल्या आहेत. बड्या सेलिब्रिटी सहदेवच्या गाण्यांवर रील्स बनवतात.

दरम्यान, घरात टीव्ही, मोबाइल नाही. तसेच सहदेवचे वडील शेतकरी आहेत, असं सहदेवने सांगितलं. मी मोठा झाल्यावर गायक बनू इच्छितो, असंही त्याने सांगितलंय.

बादशाहने स्वतः त्याच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने सहदेवसोबत संपर्क साधला. बादशाहने मुलासोबत व्हिडीओ कॉलवर गप्पा मारल्या आणि त्याला चंदीगढला भेटायला बोलवलंय.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा