InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

दिल्लीतील रबर फॅक्टरीत भीषण आग; तीन जणांचा मृत्यू

- Advertisement -

दिल्लीतील रबर फॅक्टरीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी (13 जुलै) झिलमिल इंडस्ट्रियल एरियामधील एका रबर फॅक्टरीला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रबर फॅक्ट्रीला भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग लागली त्यावेळी अनेक जण फॅक्टरीत होते. मात्र त्याचा नेमका आकडा समोर आलेला नाही. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

Loading...

- Advertisement -

Loading...

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.