InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णाधारपदी रशीद खान याची निवड

अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णाधारपदी अष्टपैलू खेळाडू रशीद खान याची निवड झाली आहे. कसोटी, एकदिवसीय तसेच टी-२० सामन्यांमध्ये तो अफगाणिस्तानचे नेतृत्व करेल. असगर अफगान हा संघाचा उप-कर्णधार असेल, अशी माहिती अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली आहे.

इंग्लंड येथे सुरू असलेल्या एकदिवसीय विश्वचषक २०१९ स्पर्धेत अफगानिस्तान संघाचे खराब प्रदर्शन झाले. संघाला एकही सामना जिंकता आला नाही. गुणतालिकेत त्यांना सर्वात शेवटचे स्थान मिळाले. स्पर्धेतील खराब प्रदर्शनामुळे संघाच्या नेतृत्वात बदल केल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

राशीद खान याने कर्णधारपदी निवड झाल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. तो म्हणाला, अफगाणिस्तान संघाच्या आगामी स्पर्धांमध्ये आम्ही चांगले प्रदर्शन करणार आहे. यासाठी नवीन रणनीती बनवली जाणार आहे. संघ सहकारी नव्या जोशात सराव करत असून संघ भावनेने खेळ करण्यात तयार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply