Rashmika Mandana | ‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटू सोबत रश्मिका मंदनाचा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ सध्या 2022 च्या आशिया कपमध्ये खेळत आहे. या टूर्नामेंट मध्ये आत्तापर्यंत संघाने शानदार प्रदर्शन केलं असून भारताने सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. आशिया कप स्पर्धा सुरू असताना कॅप्टन रोहित शर्माने इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर केली आहे. अशीच पोस्ट  रश्मिका मंदना हिने देखील शेअर केल्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच रश्मिका आता क्रिकेटपटू सोबत चित्रपटात दिसणार का सवाल समोर येत आहे.

सुपर 4 मध्ये भारताचा सामना पाकिस्तान अथवा हाँगकाँग सोबत होऊ शकतो. रोहित शर्माने शेअर केलेला फोटो हा चित्रपटाच्या पोस्टर सारखा आहे. रोहित या फोटोमध्ये एकटा दिसत असून त्याच्याखाली ‘मेगा ब्लॉकस्टर’ असं फोटोवर लिहिण्यात आलं आहे.

4 सप्टेंबरला ट्रेलर रिलीज होणार असल्याची माहिती आहे. मी थोडा घाबरतोय हे एक प्रकारच्या डेब्यू सारखं आहे, असं रोहितने कॅप्शन मध्ये म्हटलं आहे. केवळ रोहित शर्मानेच नव्हे तर सौरव गांगुलीने देखील असाच फोटो शेअर केला आहे. शूटींग करायला मज्जा आली नवीन ब्लॉकबस्टर लवकरच रिलीज होणार असल्याचं सौरव गांगुली यांनी त्यांच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

 रश्मिका मंदना हिचा रोहित शर्मा सोबत नवीन चित्रपटः

मात्र, असाच फोटो दक्षिणाची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदनाने देखील शेअर केल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. तिघांनीही सेम पोस्ट शेअर केल्यामुळे हा पोस्ट नेमका कशाविषयी आहे आणि तो केव्हा रिलीज होणार याबद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे. मात्र आता फक्त वेगवेगळे अंदाज लावण्यात येत आहे, तरी हा कुठल्यातरी चित्रपट असू शकतो, अशी शक्यता आहे. रश्मिका मंदना आणि रोहित शर्मा चित्रपटात एकत्र दिसणार का? असा प्रश्न चहात्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

महत्वाच्या बातम्याः

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.