Rashtriya Swayamsevak Sangh | राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला- कॉँग्रेस

Rashtriya Swayamsevak Sangh | टीम महाराष्ट्र देशा: अलीकडेच कर्नाटक विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपला पराभूत केलं. त्यानंतर आता 24 मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अशात मंत्री प्रियांक खर्गे यांच्या वक्तव्यानंतर कर्नाटकमध्ये राजकारण तापलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याच्या प्रियंक खर्गे यांच्या वक्तव्यानंतर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. हिम्मत असेल तर RSS आणि बजरंग दलावर बंदी घालून दाखवा असं आवाहन भाजपने काँग्रेसला दिलं  आहे.

Congress said ban Rashtriya Swayamsevak Sangh (RSS)

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. “मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी हिम्मत असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवा संघ (RSS) आणि बजरंग दलावर बंदी घालून दाखवावी. त्यांना विकसापेक्षा सुडाचे राजकारण महत्त्वाचे आहे. काँग्रेसने काही केलं तरी आम्ही त्याला सामोरे जायला तयार आहोत.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “काँग्रेस नेते राष्ट्रीय स्वयंसेवा संघ (RSS) आणि बजरंग दलावर बंदी घालण्याबाबत बोलत आहेत. मात्र, त्यांना कोणत्याही संस्थेवर बंदी घालण्याचा अधिकार नाही. हा विषय केंद्र सरकारचा आहे. हे सर्व माहिती असूनही त्यांना सुडाचे राजकारण करायचे आहे.”

“सिद्धरामय्या यांना विचारतो की या मुद्द्यावर तुमचं मत काय आहे? तुम्ही तुमच्या मंत्र्यांच्या मताशी सहमत आहात का? संघ (RSS) परिवारावर कोणीच बंदी घालू शकत नाही. ज्यांना त्यांच्यावर बंदी घालायची होती. त्यांना आधीच घरी पाठवलं आहे. हे विधान आम्ही आव्हान म्हणून स्वीकारतो आणि त्याला राजकीय दृष्ट्या सामोरे जातो,” असेही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/45r54mW

You might also like

Comments are closed.