राऊतांना बाळासाहेबांचा विसर पडला, फक्त नेहरूंची पुण्याई आठवतेय; दरेकरांची घणाघाती टीका

मुंबई : देशात भाजपा सरकारला सात वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. ‘आजही मोदींना अजून बरंच काम करायचं बाकी आहे. त्यांच्या नेतृत्व क्षमतेवर अविश्वास नाही, पण आजही आपला देश नेहरुंच्याच पुण्याईवर चालला आहे,’ असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

तर यानंतर आता संजय राऊत आणि शिवसेनेला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याचा विसर पडला आहे. सत्तेत राहण्यासाठी त्यांना सध्या फक्त काँग्रेस आणि जवाहर लाल नेहरू यांची पुण्याई आठवत आहे, अशी विखारी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. केंद्रातील भाजप सरकारने ७ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने काँग्रेसने केलेल्या आंदोलनाला लोकांनी प्रतिसादच दिला, नाही असंही दरेकर म्हणाले आहेत.

प्रवीण दरेकर यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर चर्चा केली. मोदी सरकारच्या सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेसनं केलेले आंदोलन फुसका बार निघाला. पण या आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. अनेक ठिकाणी गर्दी झाली. माझ्यावर कारवनाई केली, गुन्हे नोंदवले तशी कारवाई मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर करावी अशी मागणीही दरेकरांनी केली. ७ वर्षात आम्ही काय केलं ते सांगायला तयार आहोत. पण तुम्ही ७० वर्षांत कोणती कामगिरी केली हे ते सांगायला तयार आहात का? असा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा