‘राऊत माझे मित्र आहेत, त्यांनी मानहानीची किंमत जास्त करावी’, चंद्रकांत पाटलांचा खोचक सल्ला’

मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर शाब्दिक यौद्ध सुरु आहेत. सुरवातीला किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील मंत्र्यांना धारेवर धरलं आहे. तर दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री शिवसेनेचे अनंत गीते यांनी सेना नेतृत्वाला घरचा आहेर दिला आहे. दोन्ही काँग्रेस जर एक होऊ शकत नाहीत तर शिवसेना आणि काँग्रेस कदापि एक होऊ शकत नाहीत, असं अनंत गीते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच मुळात काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालाय, असा घणाघात गीते यांनी यावेळी केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत, महाविकास आघाडी सरकार ही केवळ सत्तेसाठी केलेली तडजोड आहे, असं म्हणत अनंत गीते यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे.

तसेच मी पाटलांवर केवळ सव्वा रुपयांचा दावा ठोकणार आहे. कारण पाटलांची लायकी कोट्यवधी रुपयांची नाही. त्यांची किंमतच केवळ सव्वा रुपया आहे, असं म्हणत राऊतांनी तिखट शब्दांत पाटलांवर पलटवार केला आहे. तर यावरच चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

’संजय राऊत माझ्यावर सव्वा रुपयांची मानाहानी करणार असल्याचं मी ऐकलं आहे. ते माझे मित्रं आहेत. त्यामुळे त्यांना मी एकच सूचवेन की, त्यांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी. कारण राऊतांची मानहानी निश्चितच सव्वा रुपयांची नाही, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या