‘तू इधर उधर कि न बात कर, ये बता कि काफिला क्यू लुटा!’, राऊतांचा शायरीतून सोमय्यांवर वार

मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून महाविकासाआघाडीतील नेत्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करत आहे. यावरूनच सध्या महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरु आहे. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांनाच पत्र लिहून दणका दिला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली 500 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा झाल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.परिणामी राज्याच्या राजकारणात सध्या राऊतांच्या पत्राची जोरदार चर्चा होताना दिसतेय. मला असं समजलय स्मार्ट सिटी प्रकल्पात 500 कोटींचा घोटाळा झाला आहे. आपण हा घोटाळा उघड करावा ही विनंती मी आपणाला पत्राद्वारे करतो आहे.

यावर सोमय्या म्हणाले कि, “मला कळत नाही की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते संजय राऊत यांचे आभार मानावे की आश्चर्य व्यक्त करावे? त्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अविश्वास! त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या अकार्यक्षमतेसंदर्भात शंका उपस्थित केला आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाबद्दल आस्था प्रदर्शित केली, हे आधी मला समजून घ्यायचे आहे. त्यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी खुलासा करावा.”

दरम्यान, सोमय्या यांनी या कथित भ्रष्टाचारावर भाष्य न केल्याने संजय राऊत यांनी शायरीद्वारे सोमय्यांवर टीका केली आहे. ‘तू इधर उधर कि न बात कर, ये बता कि काफिला क्यू लुटा’ असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा