विराट कोहली मोहम्मद शमीच्या पाठीशी उभा राहिला, तेव्हाच अंदाज यायला हवा होता की त्याचं कर्णधारपद जाणार

मुंबई : बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघात मोठे बदल जाहीर आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी-20 विश्वचषक क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर विराटच्या या निर्णयाचा क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला होता. यानंतर टी-20 विश्वचषक क्रिकेट संघाची कमान भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माकडे सोपवण्यात आली.

यानंतर आता भारतीय एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी देखील रोहित शर्माची वर्णी लागली आहे. रोहित शर्माला टी-20 नंतर एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने विराट कोहलीला वनडे कर्णधारपदावरून हटवून ही जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीला बीसीसीआयने पायउतार होण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली होती, अशीही चर्चा सुरू आहे.

या प्रकरणावर आता महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत वक्तव्य केलय. नितीन राऊत यांनी याबाबत ट्विट केले आहे. “पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर ज्या खंबीरपणे विराट कोहली मोहम्मद शमीच्या पाठीशी उभा राहिला होता, तेव्हाच अंदाज यायला हवा होता की त्याचं कर्णधारपद जाणार. क्रिकेट नियामक मंडळात सध्या ‘शाहजादे’ राज्य करत आहेत ना!” असं राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा