‘वाघाशी मैत्री होत नाही, कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो’, राऊतांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

नाशिक : वाघाशीही दोस्ती करू म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. संजय राऊत हे सध्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत,नाशिकसह जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या संघटनात्मक स्थितीचा ते आढावा घेत आहेत.

ठाकरे आणि मोदी यांची एकांतात भेट घेतल्यापासून राज्यात राजकीय चर्चांना वेग आला आहे.‘उद्धव ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगलं जमतंय पण आमच्याशी का जमत नाही माहित नाही. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जर आदेश दिले तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत,’ असं विधान करून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा ‘युती’चे संकेत दिलेत.

मात्र वाघाशी मैत्री होत नाही. कुणाशी मैत्री करायची हे वाघच ठरवतो. दरम्यान, संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली.पंतप्रधान हे देशाचे असतात त्यांनी राजकीय प्रचार करू नये, पश्चिम बंगालमध्ये जे झाले ते चुकीचे होते. पंतप्रधानांनी राजकीय प्रचार करता कामा नये, मग ते मनमोहन सिंग असतील किंवा नरेंद्र मोदी असतील. बाळासाहेब ठाकरेही हीच भूमिका मांडायचे. तसेच भाजपाला जे यश मिळत आहे ते मोदींच्या चेहऱ्यामुळेच मिळत आहे. मोदी हेच भाजपाचे नेते आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा