Ravi Rana | आधी छगन भुजबळ त्यानंतर धनंजय मुंडे तर आता आमदार रवी राणांना जीवे-मारण्याची धमकी

Ravi Rana | अमरावती: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जीवे-मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. त्यानंतर आता अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांना देखील जीवे-मारण्याच्या धमकीचा फोन आला असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अमरावतीच्या राजपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

A person named Arjun Lokhande called Ravi Rana and threatened to kill him

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील अर्जुन लोखंडे नावाच्या व्यक्तींनं रवी राणांना (Ravi Rana) फोन करून जीवे-मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती मिळाली आहे. तू महाराष्ट्र फिरणं बंद कर. तू आमच्या विरोधात कसं काय बोलतो? आता जर तू थांबला नाहीस तर तुला संपवून टाकू. अचानक काही झालं किंवा अपघात झाला तर परत बोलू नको, असं दाखल केलेल्या पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर अजित पवार गटाच्या छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना देखील जीवे-मारण्याच्या धमकीचा (Ravi Rana) फोन आला होता. धनंजय मुंडे यांना परळी येथील निवासस्थानी हा फोन कॉल आला होता. धमकी देणाऱ्या व्यक्तींनं त्यांच्याकडे 50 लाख रुपयांची मागणी केली होती. या फोननंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यासह छगन भुजबळ यांना देखील धमकीचा फोन आला होता. छगन भुजबळ यांच्या कार्यालयात हा फोन आला होता. तुम्हाला मारण्याची सुपारी मला दिलेली असून उद्या मी तुम्हाला मारणार आहे, असं त्या व्यक्तीला म्हटलं होतं. या संदर्भातील ऑडिओ क्लिप देखील समोर आली होती. भुजबळ यांना मिळालेल्या धमकीनंतर (Ravi Rana) पोलिसांनी लगेच तपास करायला सुरुवात केली होती. पुणे पोलिसांनी भुजबळांना धमकी देणाऱ्या तरुणाला अटक केलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3DaR3Nq