Ravi Rana | “उद्धव ठाकरे यांनी…”, रवी राणा यांची पुन्हा जीभ घसरली

Ravi Rana | मुंबई : रवी राणा (Ravi Rana) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर टीका केली. यावेळी राणा यांची जीभ घसरल्याने राजकारणात नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे. काही दिवसांपुर्वीच रवी राणा आणि बच्चू कडू वाद जोरदार पेचला होता. असातच उद्धव ठाकरे यांच्याबाबत राणांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वाद सुरु होऊ शकतो.

यावेळी, द्धव ठाकरे देशविरोधी वक्तव्य करणारे राहुल गांधी यांना समर्थन करतात. उद्धव ठाकरे यांनी खरंतर चुल्लूभर पाणीमध्ये डुबून मरायला पाहिजे, असा घणाघात रवी राणा यांनी केला आहे.

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना इंग्रजांनी काळ्या पाण्याची शिक्षा दिली, देशावर प्रेम करणारे, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वत:ला समर्पित करणारे वीर सावरकर यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं, त्यांच्या वक्तव्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समर्थन केलं, असं देखील राणा म्हणाले.

दरम्यान, राहुल गांधी अशाप्रकारचे वक्तव्य करतात आणि उद्धव ठाकरे त्यांचं समर्थन करतात. त्यामुळे दोघांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. ही माझी मागणी आहे, अशी मागणी देखील रवी राणा यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.