Ravi Rana । “मी फडणवीसांचा सच्चा शिपाई आहे, त्यामुळे मी त्याला भीक घालत नाही”; रवी राणांची बच्चू कडूंवर सडकून टीका

Ravi Rana | मुंबई : अमरावती येथील आमदार रवी राणा आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्यात चांगलाच वाद पेटताना दिसत आहे. बच्चू कडू यांनी केलेल्या किराणा वाटपावर रवी राणा यांनी टीका केली होती. यावरुन बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी बदनामीचा आरोप करत रवी राणा (Ravi Rana) यांच्या विरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आमदार रवी राणा यांना ‘बच्चू कडू आणि तुमच्यात वाद सुरू आहे. त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी काय बोलणे झाले आहे का, असा प्रश्न विचारताच ते म्हणाले, माझा कोणाशीही वाद नाही. आज दिवाळी आहे. दिवाळीसारख्या सणात संकटात सापडलेल्या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजं. माझ्यावर जे आरोप होत आहेत. माझ्यावर खालच्या पातळीवरून जे बोलंलं जात आहे. मी जे काय चांगलं कामं करतोय, त्याच्यावर टीका केली जाते. पण त्यांचा हिशेब जनता नक्की करेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. मी कोणावरही टीका केलेली नाही. माझ्याविरोधात जे कोणी पोलिस स्टेशनमध्ये गेले असतील किंवा उपोषण केलं असेल, त्यांना माझा सल्ला आहे की, उपोषण करायचं असेल तर राज्यातील उपेक्षित लोकांसाठी करावं, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.

पुढे ते म्हणाले, रवी राणांवर एक नाही तर पन्नास जरी गुन्हे दाखल झाले तरी राणा हा सत्यावर चालणारा व्यक्ती आहे. सत्यासाठी लढणारा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी सच्चा शिपाई आहे. फडणवीसांचे संस्कार, गोरगरीबांसाठी लढण्याची त्यांची जी दिशा आहे, त्याच दिशेने मी चाललो आहे. त्यामुळे कोणी कितीही माझा रिपोर्ट दिला, अथवा माझ्याविरोधात आंदोलन, उपोषण केले. त्याला मी भीक घालत नाही, असं म्हणत त्यांनी बच्चू कडूंना टोला लगावला आहे.

काय म्हणालेत बच्चू कडू?

20-20 वर्षे आमचे राजकीय करिअर उभं करायला गेले असून रवी राणा यांनी माझी बदनामी केली असल्याचं बच्चू कडू म्हणाले. तसेच, मी जर पैसे घेऊन गुवाहाटीला गेलो असेल तर नक्कीच पैसे देवेंद्र फडणवीस अथवा एकनाथ शिंदेजी यांनी दिले असतील. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील नोटीस पाठवणार आहोत का. तुम्ही पैसे दिले असतील तर स्पष्ट करा. आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून सांगता, रवी राणा यांनी आरोप केले तर पुरावे देखील द्यावे, एकीकडे आरोप करतात तर दुसरीकडे स्वतः मंत्रिपदाच्या रांगेत उभे राहता, आता आरपारची लढाई लढायला मी तयार आहे, असा टोला बच्चू कडूंनी लगावला आहे. रवी राणा यांनी केलेल्या आरोपाचे पुरावे त्यांनी १ तारखेपर्यंत द्यावे. जर पुरावे दिले तर मी त्यांच्या घरी भांडी घासेन आणि जर पुरावे दिले नाहीत तर मी ते कायम हिजडा म्हणेल, अशा खालच्या शब्दात बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.