Ravi Rana । मोठी बातमी : रवी राणा यांची शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता

Ravi Rana । मुंबई : राज्यात शिंदे सरकार अस्तित्वात येऊन आता जवळपास १ महिना होऊन गेला. मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार नाही. यावरून विरोधक वारंवार सरकारवर टीका करत असतात. त्यातच आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 5 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. उद्या संध्याकाळी राजभवनात शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याबाबत संकेत दिले होते. यानंतर मंत्रिमंडळात आता बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

रवी राणा यांनीही एकनाथ शिंदे सरकारला पाठिंबा दिला आहे. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी हनुमान चालिसाच्या मुद्द्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात शड्डू ठोकला होता. एवढेच नाही, तर या दांपत्यावर उद्धव ठाकरे यांना आव्हान देत ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणाही केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते; परंतु त्यांना ‘हनुमान चालिसा’चे फळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून 5 ऑगस्टपर्यंत शपथविधी होण्याची शक्यता असल्याचे वृत्त गुरुवारी सकाळी आले. एवढेच नाही तर 15 ते 16 आमदारांची नावेही चर्चेत होती, ज्यांच्याबाबत हे मंत्री मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे बोलले जात होते. मात्र आता पुन्हा एकदा पेंच त्यात अडकल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत ते अमित शहा आणि जेपी नड्डा यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.