ही शिवसेना नव्हे, ही तर काँग्रेस सेना; शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यावरुन रवी राणा आक्रमक

अमरावती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून अमरावतीत राजकारण चांगलेच तापले आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी अपक्ष आमदार रवी राणा यांनी अमरावतीमधील राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांच पुतळा बसवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आता महानगरपालिकने हटवला आहे.

शिवरायांचा हा पुतळा आमदार रवी राणा यांनी विना परवानगी बसविला होता. अमरावती महानगरपालिकेने केलेल्या दाव्यानुसार हा पुतळा परवानगी न घेता उभारण्यात आला होता. त्यामुळे यावर कारवाई करण्यात आली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद चिघळणार असल्याचे चित्र आहे. तसेच सध्या अमरावतीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.

आमदार रवी राणा यांनी यावरून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे सरकार शिवप्रेमींची गळचेपी करत आहेत. तसेच आताची शिवसेना ही शिवसेना नसून ती काँग्रेस सेना झाली आहे’ अशी टीका रवी राणा यांनी केली. त्यामुळे राणा दाम्पत्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यादरम्यान खासदार नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये वाद पेटला होता.

महत्वाच्या बातम्या

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा