Ravichandran Ashwin। मोहम्मद नवाजचा चेंडू वाईड गेला नसता, तर मी निवृत्ती घेतली असती, अश्विनचे ​​धक्कादायक विधान

Ravichandran Ashwin । नवी दिल्ली : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद नवाजच्या वाईड बॉलवर रविचंद्रन अश्विन याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. जर तो चेंडू वाईड गेला नसता तर त्याने थेट ड्रेसिंग रूममध्ये जाऊन निवृत्ती जाहीर केली असती, असे त्याने म्हटले आहे. खरे तर भारतीय संघाला शेवटच्या दोन चेंडूंवर दोन धावांची गरज असताना दिनेश कार्तिक यष्टीचीत झाला.

आता भारताला एका चेंडूवर विजयासाठी दोन धावांची गरज होती. रविचंद्रन अश्विन क्रीजवर होता. अश्विनने बरीच हुशारी दाखवत चेंडू लेग-साइडच्या दिशेने जाण्याशी छेडछाड केली नाही. चेंडू वाईड गेला. यानंतर त्याने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. रविचंद्रन अश्विनने ज्या प्रकारे नवाजचा चेंडू सोडला आणि त्याला वाईड केले, त्यामुळे त्याचे खूप कौतुक केले जात आहे.

कारण यामुळे सामना बरोबरीत आला आणि भारतीय संघावरील दडपण दूर झाले. हृषीकेश कानिटकर यांच्याशी झालेल्या संवादादरम्यान अश्विनने त्या वाइड बॉलवर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाले, जर नवाजचा चेंडू वळला असता आणि माझ्या पॅडवर आदळला असता, तर मी थेट ड्रेसिंग रूममध्ये गेलो असतो आणि ट्विटरवर लिहिले असते, ‘धन्यवाद, माझी क्रिकेटची कारकीर्द अप्रतिम होती आणि तुम्हा सर्वांचे आभार’ , असं तो यावेळी म्हणाला.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.