Ravindra Dhangekar | “भाजप कसब्यात पैसे वाटतंय अन् पोलीस…”; रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरेप
Ravindra Dhangekar | पुणे : पुण्यातील कसबा पेठ (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) पोट निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात अनेक मोठ्या नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. कसब्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केला आहे. “भाजपकडून पोलिसांना हाताशी धरून पैसे वाटप केले जात आहे”, असा गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.
रविंद्र धंगेकर पत्नीसह उपोषणाला (Ravindra Dhangekar)
पुण्यातील पोट निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे. त्यापूर्वीच रवींद्र धंगेकर आक्रमक झाले आहेत. “पुण्यातील पैसे वाटपात पोलिसांवर दबाव येत आहे. सामान्य कुटुंबातील उमेदवार विजयी होणार, असं दिसत असताना भाजपने पैसे वाटप सुरु केले”, असं म्हणत कसबा गणपतीसमोर पत्नीसह ते उपोषणाला बसत आहेत. धंगेकर यांच्यासोबत काँग्रेस नेतेही उपोषणाला बसत आहेत.
“माझ्या कार्यकर्त्यांना बोलावून दमदाटी” (Ravindra Dhangekar’s serious allegation on BJP )
“पुण्यात पैशांचा पाऊस पडतोय. भाजपकडून लोकांना पैसे वाटले जात आहेत. पोलीस उघड्या डोळ्यांनी पाहात आहेत. पोलिसांनी माझ्या कार्यकर्त्यांना बोलावून दमदाटी केली. काल मी एका पोलीस अधिकाऱ्याला भेटलो. तो हतबल होता. पण आज जनतेसमोर मला हे बोलावच लागेल. भाजप कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे”, असा दावाही धंगेकर यांनी केला आहे.
रविवारी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. तसेच नाके तपासणी आणखी कडक करण्याचे नियोजन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. प्रचार संपल्यानंतर कुठेही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली.
आणखी काय म्हणाले रविंद्र धंगेकर?
“आदर्श आचारसंहितेचा नियम धाब्यावर बसवून पैसे वाटप आणि प्रचार सुरु आहे. महाराष्ट्र हा एक आदर्श असताना गेल्या पाच दिवसात इथली स्थिती बिहार आणि उत्तर प्रदेशसारखी झाली आहे. आचारसंहिता लागू झाली असताना बाहेरच्या जिल्ह्यातील माणूस थांबू शक नाही. असं असताना चंद्रकांत पाटील कसबा पेठेत पायी पदयात्रा करत होते. आम्ही स्पष्ट तक्रार दाखल केली. 7.40 वाजता मुख्यमंत्री रविवार पेठेतील कापडगंजमध्ये प्रचार करत होते”, असे रविंद्र धंगेकरांनी सांगितले आहे.
“मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांनी नियमांचा भंग केला”
“अडीच-तीन वाजेपर्यंत आम्ही पोलीस कंट्रोलला केले. पण पोलीस काही कारवाई करत नाही. निवडणूक निर्णायक अधिकारी, प्रचार प्रमुखांकडे तक्रार केली. पण त्या तक्रारींची दखल यंत्रणा घेत नाहीत. मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांनी नियमांचा भंग केला आहे म्हणून आम्ही उपोषणाला बसणार आहेत”, असेही रविंद्र धंगेकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Sanjay Shirsat | “आमच्याकडे आणखी काही मुघल, निजाम बाकी, ते औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन..”
- Bank Of Baroda | BOB मध्ये ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Hair Fall | ‘या’ गोष्टी थांबवू शकतात केस गळती, जाणून घ्या
- RRR | अभिमानस्पद! हॉलीवुडमध्ये पुन्हा एकदा भारतीय चित्रपटाचे वर्चस्व, RRR ठरला जगातला सर्वोत्कृष्ट चित्रपट
- Job Opportunity | आयकर विभागात ‘ही’ रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Comments are closed.