Ravindra Dhangekar | “मुख्यमंत्री शिंदेंनी ज्या घरात पैसे वाटले ते घर माझच होतं”; धंगेकरांचा गंभीर आरोप

Ravindra Dhangekar | पुणे : पुण्यातील कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकचं काल मतदान झालं  आणि निवडणूक संपली असली मात्र, तरीही या निवडणुकीचे आरोप-प्रत्यारोपांचे फटाके अजूनही फुटतच आहेत.

‘भाजपने कसब्यात पैसे वाटले’, असा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी मतदानाच्या दिवशी उपोषणही केलं होतं. आज रवींद्र धंगेकर यांनी आणखी एक मोठा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु आहे.

“मुख्यमंत्र्यांनी माझ्या घरी पैसे वाटलेत, गुन्हा दाखल करा”

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात पैसे वाटले आणि ज्या घरात पैसे वाटले ते घरं माझं होतं. पैसे वाटप केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रवीण दरेकर ,चंद्रकांत पाटलांवरही निवडणूक आयोगानं गुन्हा दाखल करावा. माझ्यावरचं अन्याय का? हा पक्षपातीपणा कशासाठी?”, असा सवाल रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. धंगेकरांच्या या आरोपामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

A case has been registered

कसबा पोटनिवडणूकीतील भाजप उमेदवार हेमंत रासनेसह काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धंगेकरांनी आचारसंहितेचा भंग करत उपोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तर रुपाली पाटील यांनी गोपनियतेचा भंग केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“मला विजयाचा विश्वास”

“या पोटनिवडणुकीत मी 15 ते 20 हजार मतांनी निवडून येणार आहे. मी कार्यकर्ता आहे. मला विजयाचा विश्वास आहे”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच निवडून येणं शक्य नसल्यानेच पुण्यात पैसे वाटप केलं गेल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-