Ravindra Dhangekar Win | भाजपच्या हातून कसबा निसटलंच; महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकरांचा मोठा विजय

Ravindra Dhangekar Win | पुणे : गेल्या महिन्याभरापासून राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. या मतमोजणीमध्ये महीविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत पहिल्या फेरीपासून धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती.

महाविकास आघाडीची भाजपवर मात

गेल्या 28 वर्षांपासून भाजपच्या हातात असलेलाा कसबा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे. रवींद्र धंगेकरांनी भाजपवर मोठा विजय मिळवला आहे. दिसून येत आहे. कसब्यामध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर तिथे पोटनिवडणुका लागल्या. या निवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली जात होती.

कसब्यात भाजपवर नाराजी

खुद्द टिळक कुटुंबातूनही तशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, त्याऐवजी भाजपकडून माजी आमदार हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यामुळे कसब्यात भाजपविरोधी नाराजी असल्याचं सांगितलं जात होतं. अखेर आज मतमोजणीनंतर ही नाराजी निकालाच्या रुपाने दिसून आल्याचं सांगितलं जात आहे.

काँग्रेसने भाजपचा बालेकिल्ला हिसकावला

काँग्रेसने भाजपचा बालेकिल्ला हिसकावला आहे. तब्बल 28 वर्षांनंतर कसब्यामध्ये आमदारकी भाजपकडून काँग्रेसकडे आली आहे. याआधी 1992 च्या निवडणुकीत कसब्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. 2009 मध्येही कसब्यामध्ये रवींद्र धंगेकरांनी गिरीश बापट यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांना विजय मिळवण्यात अपयश आलं. यंदाच्या निवडणुकीत भाजपविरोधी असणारी नाराजी रवींद्र धंगेकरांच्या पथ्यावर पडल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.