Raw Papaya | कच्च्या पपईचे सेवन केल्याने महिलांना मिळू शकतात ‘हे’ फायदे

Raw Papaya | टीम महाराष्ट्र देशा: पपई आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. पिकलेली पपई आणि न पिकलेली पपई दोन्ही आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. कच्च्या पपईमध्ये विटामिन ए, विटामिन सी, विटामिन बी, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम इत्यादी पोषक गुणधर्म आढळून येतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. कच्च्या पपईचे सेवन करणे महिलांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कच्ची पपई खाल्याने महिलांच्या मासिक पाळी, युरीन इन्फेक्शन इत्यादी समस्या दूर होऊ शकतात. कच्च्या पपईचे सेवन केल्याने महिलांना खालील फायदे मिळू शकतात.

युरीन इन्फेक्शन दूर होते (Urine infection is cured-Raw Papaya Benefits)

महिलांमध्ये होणारी युरीन इन्फेक्शनची समस्या अतिशय सामान्य समस्या आहे. तुम्हाला जर युरीन इन्फेक्शनचा त्रास होत असेल, तर तुम्ही कच्च्या पपईचे सेवन केले पाहिजे. कच्च्या पपईमध्ये आढळणारे गुणधर्म शरीरात संसर्ग निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाच्या वाढीस थांबवता.

मासिक पाळीतील वेदना कमी होतात (Menstrual pain is reduced-Raw Papaya Benefits)

महिलांना मासिक पाळीला सामोरे जावे लागते. मासिक पाळी दरम्यान बहुतांश महिलांना तीव्र वेदना होतात. या वेदना टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात कच्च्या पपईचा समावेश करू शकतात. कच्च्या पपईचे सेवन केल्याने तुम्हाला मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळू शकतो.

पचनसंस्था मजबूत होते (The digestive system is strengthened-Raw Papaya Benefits)

अनियमित जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अनेक महिलांना पचनाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात कच्च्या पपईच्या समावेश करू शकतात. कच्च्या पपईमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते, जे पचनक्रिया मजबूत बनवण्यास मदत करते. त्याचबरोबर कच्च्या पपईच्या नियमित सेवनाने गॅस, बद्धकोष्ठता, अपचन यासारख्या समस्या दूर होऊ शकतात.

कच्च्या पपईचे सेवन केल्याने महिलांना वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर मासिक पाळीच्या वेदनेतून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही खालील आयुर्वेदिक उपाय करू शकतात.

ओवा (Owa-For Periods Pain)

प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरामध्ये ओवा सहज उपलब्ध असतो. मासिक पाळीतील समस्यांवर मात करण्यासाठी ओवा एक रामबाण उपाय ठरू शकतो. यासाठी तुम्हाला ओवा एक ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला या पाण्याचे दिवसातून दोन ते तीन वेळा मध मिसळून सेवन करावे लागेल. या पाण्याचे सेवन केल्याने पोटदुखीच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

हळद आणि जायफळ (Turmeric And Nutmeg-For Periods Pain)

 

हळदीमध्ये अँटिइफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, जे पोटदुखीच्या समस्यांवर मात करण्यास मदत करतात. पोट दुखीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही हळद आणि जायफळाचे एकत्र सेवन करू शकतात. यासाठी तुम्हाला दुधामध्ये चिमूटभर हळद आणि जायफळ मिसळून झोपण्यापूर्वी त्याचे सेवन करावे लागेल. या पेयाचे सेवन केल्याने मासिक पाळीतील वेदनांपासून आराम मिळू शकतो आणि चांगली झोप लागू शकते.

तुळस(Basil-For Periods Pain)

 

तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. त्याचबरोबर तुळशीमध्ये आढळणारे कॉफीक ॲसिड मासिक पाळीतील वेदनांपासून आराम देते. यासाठी तुम्हाला सहा ते सात तुळशीची पाने एक कप पाण्यामध्ये उकळून घ्यावे लागेल. हे पाणी कोमट झाल्यावर तुम्हाला त्याचे सेवन करावे लागेल. या पाण्याचे सेवन केल्याने तुम्हाला मासिक पाळीतील वेदनांपासून सुटका मिळू शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.