Shaktikant Das | नवी दिल्ली : 19 मे ला भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) दोन हजार रूपयांच्या नोटा चलनातून काढण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात देखील केंद्रसरकरच्या ( Central Goverment) या निर्णयावर टीका- टिप्पणी सुरू झाली. 2016 मध्ये देखील नोटबंदीबाबत असाच निर्णय घेण्यात आल्याने सर्वांची तारांबळ उडाली होती. परंतु आता सरकारने नोटा बदलण्यासाठी काही कालावधी दिला आहे. तरी देखील सरकारने 2 हजाराची नोट चलनातून का बंद केली? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता आरबीआयचे (RBI) गव्हर्नर शक्तिकांत दास (Governor Shaktikant Das) यांनी पत्रकार परिषद घेत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले शक्तिकांत दास
यावेळी शक्तिकांत दास (Shaktikant Das) म्हणाले की, दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी चार महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी हा चार महिन्यांचा कालावधी गांभीर्यानं घ्यावा. तसचं आरबीआयने दोन हजाराच्या नोटेला क्लिन नोट पॉलिसी अंतर्गत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या पॉलिसीच्या अंतर्गत आरबीआय (RBI) हळूहळू दोन हजाराची नोट चलनातून काढून घेणार असल्याचं देखील सांगितल होत. सरकारी आकडेवारीनुसार केवळ 3.62 लाख कोटी रुपयांच्या दोन हजाराच्या नोटा व्यवहारात आहेत. मात्र, त्याचं वितरण फारच कमी होत आहे. यामुळे या नोटेच जे उद्दिष्ट होत ते पूर्ण झालं असल्याने आता 2 हजाराची नोट चलनातून काढून टाकण्यात येत आहे.
What did Shaktikanta Das say?
दरम्यान, 2016 मध्ये 500 आणि 1000 ची नोट चलनातून रातोरात बाद करण्यात आली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणत पैशांचा तुटवडा निर्माण झाला असता. म्हणून पैशाचे मूल्य कायम ठेवण्यासाठी 2 हजार रुपयांची नोट चलनात आणण्यात आली . तसचं त्यावेळी नोटबंदी झाली तेव्हा देखील रातोरात 10 लाख कोटी रुपये गायब झाले होते. त्यामुळे दोन हजाराची नोट बाजारात आणली असं देखील शक्तिकांत दास (Shaktikant Das) म्हणाले. तर आता बाजारामध्ये नोटांची कमतरता नाही. व्यवहार सुरळीत होऊ शकतो. या नोटेच जे उद्धिष्ट होत ते आता पूर्ण झालं आहे. यामुळे जो काही निर्णय घेण्यात आला आहे तो विचार करून घेण्यात आला असल्याचं देखील दास यांनी म्हटलं.
महत्वाच्या बातम्या-
- Nitesh Rane | “पाकिस्तानच्या प्रेमात असलेले संजय राऊत…”; राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नितेश राणे यांची प्रतिक्रिया
- Rohit Pawar | “हा प्रयत्न सरकारला कदापि शोभणारा…”; जयंत पाटीलांच्या ईडी चौकशीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया
- Sameer Wankhede | उच्च न्यायालयाकडून समीर वानखेडेंना दिलासा! ‘या’ तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण
- Nitesh Rane | आदित्य उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचं रक्त भगवं आहे का ? – नितेश राणे
- WTC Final | WTC फायनलमध्ये टीम इंडिया उतरणार नव्या जर्सीत, जय शहांनी केली घोषणा
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3OrhCVr