मोर्चेबांधणी विधानसभेची : महेश लांडगे यांच्या विकासकामांचा घेतलेला आढावा, वाचा एका क्लिकवर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्ष आता सक्रिय झाले आहेत. नेतेमंडळी आपण मागील पाच वर्षात काय केले याची पोचपावती देण्याचा प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी केलेला विकास कामांचा आढावा आज आपण घेणार आहोत.

आमदार महेश लांडगे यांनी सन २०१४ ते २०१९ च्या काळात दोन्ही म्हणजेच पावसाळी आणि हिवाळी अधिवेशनात एकूण ७३ टक्के उपस्थिती दर्शवली आहे. या दरम्यान त्यांनी एकूण २०१ प्रश्न विचारले आहेत. त्यांची सभागृहातील एकूण उपस्थिती १६३ दिवस इतकी होती. तर ते एकूण ५८ दिवस अनुपस्थित होते. गेल्या पाच वर्षात आमदार महेश लांडगे यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यात त्यांच्या मतदारसंघातील झोपडपट्टी ग्रस्त भागातील विकासकामांचा समावेश आहे.

गेल्या पाच वर्षात आमदार महेश लांडगे यांनी राबवलेला उपक्रमामध्ये आळंदी पुणे पालखी मार्गाचे दहा पदरीकरण, व्हिजन ट्वेंटी-ट्वेंटी उपक्रमांतर्गत सामाविष्ट गावात विकासकामे, बफर झोनचा प्रश्न संपुष्टात आला, भोसरीमध्ये मल्टीस्पेशलिटी रुग्णालयाची उभारणी, तसेच हेल्पलाइनच्या माध्यमातून दहा हजारांच्यावर तक्रारींचे निवारण महेश लांडगे यांच्या कार्यकाळात झाले आहे.

Loading...

तसेच त्यांच्या कार्यकाळात चिखलीतील संतपीठ, पुणे-नाशिक महामार्गाला सेवा रस्ते, रेडझोन व त्यातील बांधकामे, भामा आसखेड पाणीपुरवठा योजना, नाशिक फाटा-मोशी-चाकण मेट्रो हे प्रश्न प्रलंबित आहेत. या सर्व प्रश्नांवर सध्या काम सुरु आहे. हे प्रश्नही लवकरच मार्गी लागण्याच्या मार्गावर आहेत. महेश लांडगे यांनी त्यांच्या या कामांमुळे जन सामान्यांमध्ये आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

आमदार महेश लांडगे यांच्या भोसरी मतदारसंघात भोसरी, दिघी, मोशी, चिखली, तळवडे, बुधगाव, अशा गावठाण समाविष्ट गावांच्या वाड्या-वस्त्या, इंद्रायणी नगर, समता नगर, सारख्या प्राधिकरणातील उच्चमध्यमवर्गीय भाग औद्योगिक पट्टा, मोरेवस्ती, मैत्री वस्ती, गुरुकुल असे कामगार भाग आणि बालाजी नगर शांतिनगर सारखा झोपडपट्ट्यांचा भाग या भागाचा समावेश होतो. या भागाचा विकास करणे हे मोठ आव्हान लांडगे यांच्या समोर होते. या भागाचा विकास त्यांनी घडवून आणला आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणूक विषयी बोलताना आमदार महेश लांडगे यांनी प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या मुद्द्यावर २०१४ ची निवडणूक लढविली होती. मागील पाच वर्षात ८३ टक्के प्रश्न सोडवले आहेत. म्हणून महापालिका निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर सत्ता मिळवली आणि ७५ टक्के विकास कामे करण्यासाठी विकास कामे सुरू आहेत अशी माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.