InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मी काय घरात गोट्या खेळतो का?; वाचा काय म्हणाले राज ठाकरे…

‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीच्या ‘महाराष्ट्र मंथन’ या  कार्यक्रमात राज ठाकरे सहभागी झाले होते. त्यावेळी प्रेक्षकांमधून एकाने त्यांना अमित ठाकरे यांच्याविषयी प्रश्न विचारला.अमित ठाकरे यांनी राजकारणात सक्रीय होण्यासाठी कोणाकडून धडे घ्यावेत, असा प्रश्न विचारला असता. राज यांनी मी काय घरात गोट्या खेळतो काय, असा अभिनय करत उत्तर दिले. त्यांनी दिलेल्या सडेतोड उत्तरामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

अमित ठाकरे हे राजकारणात सक्रिय होत आहेत. राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंकडून राजकारण, समाजकारणाचे धडे घेतले आहेत. अमित यांनी कोणाकडून राजकारणाचे व समाजकारणाचे धडे घ्यावेत, असे तुम्हाला वाटते, असा प्रश्न राज यांना करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply