‘औकातीच्या बाहेर घोषणा करायची अन् वास्तवाचे भान आले की यू टर्न घ्यायचा’; भातखळकरांचा राऊतांना टोला

मुंबई : २०२२ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांबाबत उत्सुकता वाढणार आहे. यानंतर यामध्ये आता शिवसेनेनंही उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक २०२१ मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे.तसेच गोव्यात देखील शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. गोव्यात शिवसेनेच्या स्थानिक युनिटने गेल्या पाच वर्षांपासून काम सुरू केले आहे. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी घोषणा केली आहे.

तसेच गोव्यात २०-२१ तर उत्तरप्रदेशात विधानसभेच्या ८०-१०० जागा लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गोव्यात माविआसारखा प्रयोग करू शकतो. उत्तरप्रदेशातही काही शेतकरी संघटनांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे यूपीतही माविआसारखा प्रयोग होऊ शकतो. गोवा आणि उत्तरप्रदेशात युती झाली नाही, तर आम्ही एकटे लढू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राऊतांच्या या भूमिकेवरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.

“२४ तासांत शिवसेनेच्या ३०३ जागा कमी करून उत्तर प्रदेश निवडणुकीत १०० जागा लढवण्याची संजय राऊतांनी घोषणा केली आहे. औकातीच्या बाहेर घोषणा करायची आणि मग वास्तवाचे भान आले की यू टर्न घ्यायचा. पक्ष असाच चालवतात आणि राज्य सरकारही. मधल्यामध्ये सत्यानाश मात्र जनतेचा होतो आहे.” या शब्दांत भातखळकर यांनी राऊतांवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा