“खरंच बेस्ट सीएम! चक्रीवादळालाही लाजवेल असा दौरा केलात”: मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी तौतेमुळे नुकसान झालेल्या कोकणचा दौरा केला. यावेळी त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भेट देऊन पाहणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चार तासांच्या दौऱ्यावरून विरोधीपक्ष भाजपाने निशाणा साधला होता. त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या दौऱ्यावरून टोला लगावला आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांच्या चार तासांच्या दौऱ्यावरून समाचार घेतला आहे. “मुख्यमंत्री साहेब, आम्हाला तुमचा अभिमान आहे. चक्रीवादळाला लाजवेल, असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता. पुराणकाळात देवी-देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे, तसे तुम्ही फिरलात. खरंच बेस्ट सीएम,” असं म्हणत संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

“शिवसेना आणि सरकारला भरभरून देणाऱ्या कोकणच्या तोंडाला संकट काळात मुख्यमंत्र्यांनी पाने पुसण्याचेच काम केले आहे. मुख्यमंत्री घरातून बाहेर पडले, मात्र चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत बोललेच नाही. निसर्ग वादळात अनेक घोषणा झाल्या, मात्र आपदग्रस्तांच्या हाती काही आले नाही. हेक्टरी पैसे दिल्याने ५००रु प्रतिझाड एवढीच मदत शेतकऱ्यांना मिळाली. ही एक प्रकारे कोकणवासीयांची थट्टाच आहे,” असं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा