Realme Launch | पुढच्या महिन्यात Realme ची ‘हि’ सीरिज होणार लाँच

टीम महाराष्ट्र देशा: देशातील मोबाईल उत्पादक कंपन्या नेहमी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन मॉडेल लाँच करत असते. कंपनी दरवेळी आपल्या मॉडेलमध्ये नवनवीन फीचर सादर करत असते. याच परिस्थितीचा फायदा घेत मोबाईल उत्पादक कंपनी Realme आपली नवी मोबाईल सिरीज लॉंच करणार आहे. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, Realme आपली ही सिरीज नोव्हेंबर 2022 मध्ये लॉंच करणार आहे. या नवीन सिरीज लाइनअपमध्ये Realme 10 4G, Realme 10 5G, Realme 10i, Realme 10 Pro 5G, तसेच Realme 10 Pro+ 5G इत्यादी मॉडेल्सचा समावेश आहे.

कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार Realme ची ही नवीन 10 सिरीज 3 ते 5 नोव्हेंबर दरम्यान 10 व्या चायना मोबाईल ग्लोबल पार्टनर कॉन्फरन्स मध्ये लाँच होणार आहे.

Realme 10 सिरीज स्पेसिफिकेशन

Realme च्या या नव्या सिरीजमध्ये Realme 10 Pro 2.3mm जाड वक्र डिस्प्ले उपलब्ध असेल. या सीरिजमधील Realme 105G आणि Realme 10 Pro+ नुकतेच TENAA या सूचीमध्ये दिसले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, Realme 10 Pro 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले असेल.

फीचर्स

Realme 10 सिरीज मधील Realme 10 Pro+ 5G MediaTek Dimension 1080 chipset सह येण्याची अपेक्षा आहे. तर या सिरीजच्या 4G प्रकारामध्ये MediaTek Helio प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. या मॉडल्स बॅटरी बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 5,000mAh बॅटरी उपलब्ध असून 33W या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. स्टोरेज वेरिएंटबद्दल बोलायचे झाल्यास, 4G प्रकार 4GB + 64GB आणि 4GB + 128GB स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध असू शकतो.या सिरीजच्या कॅमेरा बद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप येण्याची शक्यता आहे. यामध्ये 50MP प्रायमरी सेंसर असू शकतो जो OIS ला सपोर्ट करेल.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.