Realme Mobile | भारतामध्ये लवकरच लाँच होणार ‘हा’ Realme स्मार्टफोन

Realme Mobile | टीम महाराष्ट्र देशा: मोबाईल उत्पादक कंपनी रियलमी (Realme) नेहमी भारतीय बाजारामध्ये आपले नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते. कंपनी नेहमी आपले स्मार्टफोन उत्कृष्ट फीचर्ससह बाजारात सादर करत असते. अशा परिस्थितीमध्ये कंपनी लवकरच आपला नवीन स्मार्टफोन बाजारामध्ये सादर करणार आहे. कंपनी Realme 10 4G हा मोबाईल बाजारामध्ये लवकरच लाँच करणार आहे.

Realme ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर या फोनच्या लॉन्चिंग बाबत पोस्ट शेअर केली आहे. त्यावरून मिळालेल्या माहितीनुसार कंपनी Realme 10 4G भारतामध्ये नऊ जानेवारी रोजी लॉंच करणार आहे. कंपनीने Flipkart पेजची लिंक शेअर केली आहे. त्यानुसार कंपनी 9 जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. या फोनमध्ये कंपनी उत्कृष्ट फीचर्स देत आहे.

Realme 10 फीचर्स

कंपनी या स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट देत आहे. त्याचबरोबर यामध्ये 6.4इंच FHD + सुपर AMOLED स्क्रीन उपलब्ध असू शकते. त्याचबरोबर या मोबाईलमध्ये Helio G99 प्रोसेसर उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन 8GB + 8GB डायनॅमिक RAM ला जोडलेला असेल.

Realme 10 कॅमेरा

या मोबाईलच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले, तर या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सिस्टीम उपलब्ध असेल. यामध्ये 50MP मेन कॅमेरा आणि 2MP B&W कॅमेरा असू शकतो. त्याचबरोबर या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 16MP कॅमेरा उपलब्ध असू शकतो. या फोनच्या बॅटरी बद्दल सांगायचे झाले तर या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी उपलब्ध असेल.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.