InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

“अब्दुल सत्तारांना मी पक्षातून काढतो, आता विषय संपला”

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून, ब्दुल सत्तार यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा त्यांनी जाहीरसभेत केली आहे. भोकरदन येथे विलास औताडे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत अशोक चव्हाण यांनी घोषणा केली.

अशोक चव्हाण म्हणाले की, जालना उमेदवारी देताना आम्ही त्यांना विश्वासात घेतले होते. एवढंच नव्हे तर त्यांना स्वतःलाही उमेदवारी देऊ केली होती. मात्र, त्यांनी ती स्वीकारली नाही. ते पक्षात होते तोपर्यत आम्ही त्यांचा आदर राखला. सत्तारांना मी पक्षातून काढतो, आता विषय संपला आहे, असेही अशोक चव्हाण ठणकावून सांगितले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबतही पक्षतश्रेष्ठी राहुल गांधी यांना अवगत करण्यात आले असून त्यांच्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply