recipes – InShorts Marathi https://inshortsmarathi.com InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट Fri, 24 Aug 2018 17:02:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.4.2 https://i1.wp.com/inshortsmarathi.com/wp-content/uploads/2018/09/cropped-Inshorts-JPG-1-1.jpg?fit=32%2C32&ssl=1 recipes – InShorts Marathi https://inshortsmarathi.com 32 32 167515839 डिजिटल माध्यमांमध्ये ‘महाराष्ट्र देशा’चा डंका, फेसबुक एंगेजमेंटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर https://inshortsmarathi.com/maharashtra-is-second-in-facebook-engagement/ https://inshortsmarathi.com/maharashtra-is-second-in-facebook-engagement/#respond Thu, 10 May 2018 12:24:35 +0000 https://maharashtradesha.com/?p=33263

टीम महाराष्ट्र देशा-  फेसबुक पेज रँकिंग आणि एंगेजमेंट मध्ये महाराष्ट्र देशा दुसऱ्या स्थानावर जाऊन पोहचला आहे. वाचकांनी दिलेला प्रतिसाद आणि त्यांचा विश्वास यामुळेच हे शक्य झालं..! निर्भीड बातम्या आणि सडेतोड मुलाखतीमुळे महाराष्ट्र देशाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे ‘दर्पण’पासून सुरु झालेली मराठी वृत्तपत्रांची सुरुवात आज शकडो वृतापत्रांच्या स्वरूपामध्ये वाचकांपर्यंत देश विदेशातील ताज्या घडामोडी पोहचवण्याचे काम करतात. पुढे […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. डिजिटल माध्यमांमध्ये ‘महाराष्ट्र देशा’चा डंका, फेसबुक एंगेजमेंटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर InShorts Marathi.

]]>

टीम महाराष्ट्र देशा-  फेसबुक पेज रँकिंग आणि एंगेजमेंट मध्ये महाराष्ट्र देशा दुसऱ्या स्थानावर जाऊन पोहचला आहे. वाचकांनी दिलेला प्रतिसाद आणि त्यांचा विश्वास यामुळेच हे शक्य झालं..! निर्भीड बातम्या आणि सडेतोड मुलाखतीमुळे महाराष्ट्र देशाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे

‘दर्पण’पासून सुरु झालेली मराठी वृत्तपत्रांची सुरुवात आज शकडो वृतापत्रांच्या स्वरूपामध्ये वाचकांपर्यंत देश विदेशातील ताज्या घडामोडी पोहचवण्याचे काम करतात. पुढे काळ बदलला तसे प्रसारमाध्यमांचे स्वरूपही बदलेले. आजची घटना उद्या वाचायला मिळण्याचे साधन असलेल्या वृतापत्रांना इलेक्ट्रॉनिक मिडीयाने एक मोठा पर्याय उभा केला. कारण इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या माध्यमातून जे घडतय ते थेट व्हिडीओच्या स्वरूपातून नागरीकांपर्यंत पोहचू लागलं. काळ बदलला तसा मिडीयाच स्वरूप देखील बदलत जात आहे. आज २१ व्या शतकामध्ये वृतपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयाला एक नवीन पर्याय उभा राहत आहे तो म्हणजे डिजिटल मिडीयाचा. याच आधुनिक युगातील थोड्याच काळात वाढत असलेले माध्यम म्हणजे ‘महाराष्ट्र देशा’. महाराष्ट्र देशा न्यूज हे आता 4 Pillar Publication Pvt Ltd कंपनीचा भाग आहे.

इलेक्ट्रॉनिक मिडीयामध्ये काम करत असलेल्या अभिजित दराडे, दीपक पाठक, विरेश आंधळकर आणि मनोज जाधव या चार युवकांनी एकत्र येत प्रस्थापित मिडियाला एक नवीन पर्याय देण्यासाठी, सामन्यांचा, जागोजागी पिचल्या जाणाऱ्या गाव खेडी ते शहरातील नागरिकांचा आवाज म्हणून उभे राहण्यासाठी सुरुवात केली ती ‘महाराष्ट्र देशा’ची. संपूर्ण महाराष्ट्र हा एकसंध जातीजातीमध्ये असणारा बंदुभाव, महाराष्ट्राची अलौकिक परंपरा, छत्रपती शिवरायांचे सुराज्य आणि स्वराज्याचे स्वप्न, फुले- शाहू- आंबेडकरांचे समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्याचे व्रत आम्ही पुढे नेण्याची उर्मी बाळगतो म्हणूनच आमच्या कार्यांच नाव ‘महाराष्ट्र देशा’ हे निश्चित केले.

१६ जून २०१७ रोजी एका छोटेखाणी कार्यक्रमात ‘विशेष मुलांच्या’ हस्ते महाराष्ट्र देशा न्यूज वेबसाईटचे लाँचींग करण्यात आले. सुरुवात ते आजची परिस्थिती यामध्ये काळानुरूप बदल अंगीकारत आम्ही वाटचाल सुरु ठेवली आहे. अचूक विश्लेषण आणि निर्भीड बातम्यां, लेख यांच्यामुळे सुरुवातीला केवळ १०० वाचक संख्या असणाऱ्या आमच्या वेबसाईटला आज दिवसाला ३५ ते ५० हजारांच्यावर वाचक भेट देतात.

वृतपत्र असो कि इलेक्ट्रॉनिक मिडिया ते डिजिटल मिडीया प्रत्येकाला वाचकांपर्यंत पोहचण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करावा लागतो, जस कि वृत्तपत्रांची स्टॉलवर आणि सबस्क्रायबरला विक्री तर इलेक्ट्रॉनिक मीडियाला वेगेवगळ्या डिश सुविधांमार्फत प्रत्येकाच्या घराघरात पोहचता येते. याच पद्धतीने डिजिटल मिडीयासाठी फेसबुक, व्हॉटसअप, ट्वीटर, न्यूज मोबाईल अॅप या सोशल मिडीयाद्वारे वाचकांपर्यंत पोहचता येते. आज महाराष्ट्र देशाच्या फेसबुक पेजला ३.२१ लाखांच्यावर लाईक आणि फॉलोअर आहेत. तर ट्विटर आणि इतर माध्यमातूनही बातम्या हजारो लोकांपर्यंत पोहचतात. अवघ्या काही महिन्यांमध्येच सोशल मिडीयामध्ये प्रस्थापित वृत्त वाहिन्या आणि वृतपत्रांच्या रांगेत आम्ही दुसऱ्या स्थानावर आहोत हि आमच्या स्वत:साठी अभिमानाची बाब आहे. तसेच वाचकांनी दिलेला प्रतिसाद आणि त्यांचा विश्वास यामुळेच आम्ही हे शिखर गाठू शकलो. यासाठी वाचकांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत.

येणाऱ्या काळात गाव खेड्यांसाठी ‘गावाकडच्या गप्पा’ ‘सरपंच लाइव्ह’ यासारखे ग्राउंड रीयालीटी दाखवणारा व्हिडीओ स्वरूपातील कार्यक्रम आम्ही सुरु करत आहोत. तसेच नागरिक आणि प्रशासनामध्ये सुसंवाद घडवून आणण्यासाठी ‘अधिकारी लाइव्ह’ लाखो नागरिकांच्या विकासाची जबाबदारी असणाऱ्या आमदारांचा ‘कामाचं बोला’ हा विशेष कार्यक्रमही लवकरच सुरु होत आहे.

Date- 10 May 2018, Source- Facebook फेसबुक पेज रँकिंग आणि एगेजमेंट. वाचकांनी दिलेला प्रतिसाद आणि त्यांचा विश्वास यामुळेच हे शक्य झालं. महाराष्ट्र देशा दुसऱ्या स्थानावर. खूप खूप धन्यवाद...! #महाराष्ट्रदेशा #MaharashtraDesha #MHD

या वाटचालीत आम्हाला अनेक जेष्ठ पत्रकारांचे मार्गदर्शन लाभले ज्यामध्ये जेष्ठ पत्रकार अभय निकाळजे, टेक्निकल सहाय्यक अमोलकुमार सुपे, ETV भारतचे राहुल वाघ, न्यूज 18 लोकमतचे जेष्ठ पत्रकार अद्वैत मेहता, झी 24 तास चे अरुण म्हेत्रे, ABP माझा चे मंदार गोंजारी, मिकी घई,TV 9 चे सागर आव्हाड, संतोष आदमने (Ain news) जय महाराष्ट्र न्यूज वृत्तवाहिनीचे पत्रकार अमोल कविटकर , सचिन जाधव, सल्लागार मुकुल पोतदार, जेष्ठ पत्रकार भारत पाटील, देव शेजूळ सर, प्रा. तुषार डुकरे, अनुप सिन्हा, अक्षय वारे, निलेश रसाळ, प्रकाश बनकर, प्रा.प्रवीण कुंटे, CA विश्वनाथ जोशी, महास्पोर्टचे शरद बोदगे, थोडक्यातचे कृष्णा वरपे, पत्रकार सुदेश मिटकर, किरण शिंदे, हर्ष दुधे, सोमनाथ कड, माध्यम समन्वयक कुशल कोंडे, श्यामल खैरनार, अनुप गोरे, सागर बोदगिरे, रोहित भिसे,अॅॅड. भूषण राऊत, संजय एखंडे यासर्वांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभले आहे.

याशिवाय आम्हाला हे यशाचे शिखर गाठताना मोलाची मदत ज्या प्रतिनिधींनी केली असे आमचे वेब एडिटर संदीप कापडे, ग्राफिक्स डिझायनर तन्मय एखंडे, प्रतिनिधी श्याम पाटील, गौरव मोरे, कोमल औताडे, मयुरी वाशिंबे, स्वप्नील भालेराव, भागवत दाभाडे,अक्षय पोकळे, भावना भाटीया संचेती, अजय देशपांडे, शिवानी ठाकरे, अतिश ढवळे, ज्ञानेश्वर राजुरे, मयूर तावाडे, अपूर्व कुलकर्णी, कृष्णा रामदासी, प्रमोद लांडे,संदेश कान्हू, शलाका मुंगी, सोपान रोडगे,निवृत्ती नवथर या आणि अश्या अनेक सहकाऱ्यांची साथ लाभली.

महाराष्ट्र देशा च्या स्वतंत्र मोबाईल अॅप सह Daily hunt , Jio News Express, News Point, Public Vibe, News Plus तसेच News Dog या अग्रगंण्य अॅप वर महाराष्ट्र देशा वाचकांसाठी उपलब्ध आहे.

Facebook-  https://www.facebook.com/MahaDeshaa

Twitter-       https://twitter.com/Maha_Desha

Instagram- https://www.instagram.com/maha_desha/

Pintrest-     https://in.pinterest.com/maha_desha

YouTube-    https://www.youtube.com/c/MahaDesha?sub_confirmation=1

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. डिजिटल माध्यमांमध्ये ‘महाराष्ट्र देशा’चा डंका, फेसबुक एंगेजमेंटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/maharashtra-is-second-in-facebook-engagement/feed/ 0 33263
दिवाळी स्पेशल- खमंग व खुसखुशीत भाजणीची चकली https://inshortsmarathi.com/updated-diwali-chakali-recipe-must-try/ https://inshortsmarathi.com/updated-diwali-chakali-recipe-must-try/#respond Wed, 18 Oct 2017 06:25:36 +0000 http://maharashtradesha.com/?p=11401

दिवाळी आणि फराळ हे एक आगळ- वेगळ समीकरण आहे. गोड- तिखट पदार्थांच कॉम्बिनेशन म्हणजे फराळ. दिवाळीत मुखत्वे गोड पदार्थांमध्ये लाडू, करंजी असते.  तिखट पदार्थांमध्ये  चिवडा, चकली असते. चिवडा बनविण्यास सोपा सरळ साधा पदार्थ पण चकली मात्र किचकट पदार्थ अनेक महिला चकली किचकट असल्यामुळे शक्यतो बाहेरून रेडीमेट आणतात. किवां आजकाल बाजारपेठेत चकलीचे तयार पीठ देखील मिळते. […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. दिवाळी स्पेशल- खमंग व खुसखुशीत भाजणीची चकली InShorts Marathi.

]]>

दिवाळी आणि फराळ हे एक आगळ- वेगळ समीकरण आहे. गोड- तिखट पदार्थांच कॉम्बिनेशन म्हणजे फराळ. दिवाळीत मुखत्वे गोड पदार्थांमध्ये लाडू, करंजी असते.  तिखट पदार्थांमध्ये  चिवडा, चकली असते. चिवडा बनविण्यास सोपा सरळ साधा पदार्थ पण चकली मात्र किचकट पदार्थ अनेक महिला चकली किचकट असल्यामुळे शक्यतो बाहेरून रेडीमेट आणतात. किवां आजकाल बाजारपेठेत चकलीचे तयार पीठ देखील मिळते. पण आज आपण घरगुती व सोप्या पद्धतीने चकली कशी बनवता येते हे पाहणार आहोत.

भाजणी कशी बनवावी वाढणी : साधारण एक किलो

साहित्य:
दिड कप चणाडाळ
१/२ कप उडीदडाळ
१/२ कप मूगडाळ
२ कप तांदूळ
१/४ कप साबुदाणा
५० ग्राम जिरे (साधारण १/४ कप)
मूठभर धणे

कृती:
१) सर्व डाळी वेगवेगळया धुवून घ्याव्यात. वेगवेगळया सुती कपड्यावर सावलीत वाळत घालाव्यात.
२) तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवून घ्यावेत.
३) सर्व डाळी ब्राऊनिश रंग येईस्तोवर वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. तांदूळ आणि साबुदाणे वेगवेगळे भाजून घ्यावेत.जिरे धणे भाजून घ्यावेत.
४) सर्व डाळी, तांदूळ, साबुदाणे व इतर जिन्नस एकत्र करून थंड होवू द्यावे. थंड झाले कि बारीक दळून आणावे.

टीपा:
१) चकली भाजणीसाठी बिनसालाची उडीद आणि मुगडाळ वापरावी. सालासकट वापरल्यास चकल्या रंगाने काळ्या होतात आणि भाजणीचा स्वादसुद्धा चांगला लागत नाही.
२) सर्व डाळींवरील पावडर काढण्यासाठी ती न धुता ओल्या पंच्याला वेगवेगळ्या पुसून घ्याव्यात. यामुळे डाळी वाळवण्याचा वेळ वाचतो. तसेच डाळी भाजताना वेळ कमी लागतो.

भाजणीची चकली

भाजणी पासून चकली बनविणे

साहित्य:
१ कप चकलीची भाजणी
१ कप पाणी
१ टिस्पून हिंग
२ टिस्पून पांढरे तिळ
१/२ चमचा ओवा
१ टेस्पून लाल तिखट
१ टिस्पून तेल
चवीपुरते मिठ

कृती:
१) १ कप पाणी पातेल्यात उकळत ठेवावे. त्यात हिंग, लाल तिखट, तेल, ओवा, पांढरे तिळ आणि मीठ घालून ढवळावे.
२) पाणी उकळले कि गॅस बंद करावा, चकलीची भाजणी घालावी आणि ढवळावे. ७-८ मिनीटे झाकून ठेवावे.
३) कोमट पाण्याचा हात लावून पिठ मळावे.
४) चकलीच्या सो‍र्‍याला आतून तेलाचा हात लावावा म्हणजे पिठ चिकटणार नाही. सोर्‍यामध्ये चकलीच्या पिठाचा गोळा भरून चकल्या पाडाव्यात. मध्यम आचेवर चकल्या तळून घ्याव्यात.

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. दिवाळी स्पेशल- खमंग व खुसखुशीत भाजणीची चकली InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/updated-diwali-chakali-recipe-must-try/feed/ 0 11401
दिवाळी स्पेशल -ओल्या नारळाच्या वड्या https://inshortsmarathi.com/diwali-speical-olyanaralachya-vadya/ https://inshortsmarathi.com/diwali-speical-olyanaralachya-vadya/#respond Wed, 18 Oct 2017 05:42:41 +0000 http://maharashtradesha.com/?p=11843

ओल्या नारळाच्या वड्या – नारळ  हा असा घटक आहे जो नेहमी घरात उपलब्ध असतो. सण असो वा उत्सव नारळ देवाला फोडला जातो. नारळापासून अनेक पदार्थ बनविले जातात पण नारळाच्या वड्या सर्वात जास्त आवडीने खाल्या जातात. जाणून घेऊ या ओल्या नारळाच्या वड्याची रेसिपी. साहित्य: १ नारळ ३५० ग्रॅम साखर तूप वेलची पूड कृती : १) एक […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. दिवाळी स्पेशल -ओल्या नारळाच्या वड्या InShorts Marathi.

]]>

ओल्या नारळाच्या वड्या – नारळ  हा असा घटक आहे जो नेहमी घरात उपलब्ध असतो. सण असो वा उत्सव नारळ देवाला फोडला जातो. नारळापासून अनेक पदार्थ बनविले जातात पण नारळाच्या वड्या सर्वात जास्त आवडीने खाल्या जातात. जाणून घेऊ या ओल्या नारळाच्या वड्याची रेसिपी.

साहित्य:
१ नारळ
३५० ग्रॅम साखर
तूप
वेलची पूड

कृती :
१) एक नारळ खवून घ्यावा. नारळ खवताना त्यातील काळपट भाग घेऊ नये.
२) नंतर कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घ्यावे. तूप गरम झाल्यावर त्यात खवलेला नारळ घालावा.
३) मंद आचेवर थोडासा परतून घ्यावा.
४) २-३ मिनिटानंतर साखर घालून परतावे. हळूहळू साखर वितळू लागेल. मंद आचेवर ढवळत राहावे.
५) छोटा अर्धा चमचा वेलचीच पूड घालावी. हळूहळू मिश्रण घट्ट होऊ लागते.
६) एका परातीला तूप लावून घ्यावे आणि मिश्रण त्यात ओतावे. एका वाटीच्या तळाला तूप लावावे आणि मिश्रण पूर्ण परातीत समान पसरावे. अर्ध्या इंचाचा थर करावा.
७) मिश्रण गरम असतानाच सुरीने हलक्या हाताने वड्या पाडाव्यात. नाहीतर मिश्रण थंड झाल्यावर वड्या नीट पडत नाहीत.
८) मिश्रण थंड झाले की वड्या वेगवेगळ्या कराव्यात.

olya naralachya-vadya.,diwali speical,food
ओल्या नारळाची बर्फी

टिप:
१) वड्यांना केशरी रंग हवा असल्यास थोडे केशर किंवा खायचा केशरी रंग घालू शकतो.
२) जर आंब्याचा रस उपलब्ध असेल तर साखर घालताना थोडी साखर कमी करून थोडा आंबा रस घालावा. नारळ आणि आंबा एकत्र स्वाद अप्रतिम लागतो.

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. दिवाळी स्पेशल -ओल्या नारळाच्या वड्या InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/diwali-speical-olyanaralachya-vadya/feed/ 0 11843
दिवाळी स्पेशल -ओल्या नारळाच्या करंज्या https://inshortsmarathi.com/updatedkaranji-olya-naralachi-diwali/ https://inshortsmarathi.com/updatedkaranji-olya-naralachi-diwali/#respond Wed, 18 Oct 2017 05:41:41 +0000 http://maharashtradesha.com/?p=11533

दिवाळी मध्ये जे मुख्य फराळाचे पदार्थ केले जातात त्या मध्ये अत्यंत महत्त्वाचा पदार्थ म्हणजे करंजी. करंजी वर्षातून एकदाच केली जाते. त्यामुळे ती चांगली होणे गरजेचे आहे. करंजी हा पदार्थ फार निगुतीने करावा लागतो या करता खास आज आपण ओल्या नारळाच्या करंज्या पाहणार आहोत. साहित्य: :सारण सव्वा कप खोवलेला ओला नारळ पाउण कप किसलेला गूळ १/२ […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. दिवाळी स्पेशल -ओल्या नारळाच्या करंज्या InShorts Marathi.

]]>

दिवाळी मध्ये जे मुख्य फराळाचे पदार्थ केले जातात त्या मध्ये अत्यंत महत्त्वाचा पदार्थ म्हणजे करंजी. करंजी वर्षातून एकदाच केली जाते. त्यामुळे ती चांगली होणे गरजेचे आहे. करंजी हा पदार्थ फार निगुतीने करावा लागतो या करता खास आज आपण ओल्या नारळाच्या करंज्या पाहणार आहोत.

साहित्य:

:सारण
सव्वा कप खोवलेला ओला नारळ
पाउण कप किसलेला गूळ
१/२ टिस्पून वेलची पूड

करंजी पिठ
पाउण कप मैदा
पाव कप रवा
१ टिस्पून साजूक तूप, पातळ केलेले
१/२ ते पाउण कप दूध
तळण्यासाठी तेल

कृती:
१) गूळ व नारळ एकत्र करून पातेल्यात, मध्यम आचेवर शिजवावे. वेलचीपूड घालावी आणि घट्टसर मिश्रण करावे. मिश्रण ओलसर असू नयेत नाहीतर करंज्या नरम पडतात.
२) करंजीच्या आवरणासाठी एका भांड्यात रवा आणि मैदा एकत्र करावा. तूप कडकडीत गरम करून मोहन घालावे. थोडे थंड झाले कि मोहन घातलेले तूप सर्व मैद्याला लागेल असे मिक्स करावे. अंदाजे घेत घेत गार दूध घालावे आणि घट्ट मळून घ्यावे. थोडा वेळ झाकून ठेवून द्यावे.

karanji-olya-naralachi-diwali.
file photo

३) १५-२० मिनीटांनी थोडे दूधाचा हबका मारून पिठ जरा कुटून घ्यावे. पिठाचे एकेक इंचाचे गोळे करून घ्यावेत.
४) करंज्या वाळू नयेत म्हणून एक ताटली आणि एक ओला, पिळून घेतलेला कपडा तयार ठेवावा.
५) करंज्या करण्यासाठी पिठाची एक गोळी निट मळून घ्यावी. गोल आणि पातळसर पुरी लाटून घ्यावी. मध्यभागी एक चमचाभर नारळाचे सारण ठेवावे. पुरीच्या अर्ध्या कडेला किंचीत दूध लावावे म्हणजे दोन्ही कडा निट चिकटतील आणि तळताना करंजी फुटणार नाही. उरलेली रिकामी अर्धी बाजू दूध लावलेल्या बाजूवर आणून चिकटवावी. सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी. कातणाने अधिकचे पिठ कापून घ्यावे. [माझ्याकडे कातण नव्हते म्हणून काट्याने (Fork) कडेवरती थोडे डिझाईन केले.]
६) करंजी करून झाली कि ती ताटलीत ठेवून वरून ओला कपडा टाकून झाकावी म्हणजे करंजी सुकणार नाही. अशाप्रकारे सर्व करंज्या करून घ्याव्यात.
७) तळणीसाठी तेल गरम करावे. मध्यम आचेवर करंज्या सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. दिवाळी स्पेशल -ओल्या नारळाच्या करंज्या InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/updatedkaranji-olya-naralachi-diwali/feed/ 0 11533
दिवाळी स्पेशल- पाकातले बेसन लाडू https://inshortsmarathi.com/diwali-speical-pakatle-besan-ladoo/ https://inshortsmarathi.com/diwali-speical-pakatle-besan-ladoo/#respond Wed, 18 Oct 2017 05:41:33 +0000 http://maharashtradesha.com/?p=11717

पाकातले बेसन लाडू– बेसन लाडू हा लहानापासून ते मोठ्यापर्यत सर्वांचा आवडा पदार्थ आहे. बेसन लाडू करीता जास्त सामान लागत नाही. बाकीच्या पदार्थांच्या तुलनेत कमी वेळ लागतो. बेसन लाडूचे दोन प्रकार पडतात एक पाकातले बेसन लाडू व साधे बेसन लाडू आज आपण पाकातले बेसन लाडू पाहणार आहोत. साहित्य: १ वाटी बेसन १/२ वाटी साजूक तूप पाऊण […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. दिवाळी स्पेशल- पाकातले बेसन लाडू InShorts Marathi.

]]>

पाकातले बेसन लाडू– बेसन लाडू हा लहानापासून ते मोठ्यापर्यत सर्वांचा आवडा पदार्थ आहे. बेसन लाडू करीता जास्त सामान लागत नाही. बाकीच्या पदार्थांच्या तुलनेत कमी वेळ लागतो. बेसन लाडूचे दोन प्रकार पडतात एक पाकातले बेसन लाडू व साधे बेसन लाडू आज आपण पाकातले बेसन लाडू पाहणार आहोत.
साहित्य:
१ वाटी बेसन
१/२ वाटी साजूक तूप
पाऊण वाटी साखर
अर्धी वाटी पाणी
वेलची पूड
बेदाणे

कृती:
१) तूप पातेल्यात गरम करावे त्यात बेसन घालून मध्यम आचेवर खमंग भाजावे. बेसन गॅसवरून उतरवावे.
२) पाणी आणि साखर एकत्र गरम करत ठेवावे व त्याचा एकतारी पाक करावा.
३) तयार झालेला पाक गरम असतानाच भाजलेल्या बेसनात घालून ढवळावे. ढवळताना बेसनाची गोळी होण्याची शक्यता असते. त्याची काळजी घ्यावी.
४) हळूहळू पाक बेसनात मुरतो. मध्येमध्ये मिश्रण ढवळत राहावे. मिश्रणात वेलची पूड घालावी.मिश्रण थोडे घट्टसर झाले कि लाडू वळावेत. लाडू वळताना त्यावर एक एक बेदाणा लावावा.

टीप :
१) वरील कृतीमध्ये तूप बेताचेच घातले असल्याने मिश्रण पटकन आळते त्यामुळे मिश्रणावर लक्ष ठेवावे. मिश्रण जास्त आळले तर लाडू वळता येत नाहीत.

pakatle besan ladoo
पाकातले बेसन लाडू

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. दिवाळी स्पेशल- पाकातले बेसन लाडू InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/diwali-speical-pakatle-besan-ladoo/feed/ 0 11717
दिवाळी स्पेशल- मक्याचा चिवडा https://inshortsmarathi.com/update-corn-flakes-chivda-recipe-diwali/ https://inshortsmarathi.com/update-corn-flakes-chivda-recipe-diwali/#respond Wed, 18 Oct 2017 05:40:37 +0000 http://maharashtradesha.com/?p=11525

चिवडा हा असा पदार्थ आहे जो वर्षभर खाल्ला जातो. त्यामुळे दिवाळी व्यतिरिक्त चिवडा वर्षभर केला जातो. चिवड्याचे अनेक प्रकार बनविले जातात. जसे की मूरमुरे चिवडा, पातळ पोहे चिवडा, किवा भडंग चिवडा. असे अनेक प्रकार केले जातात आज आपण मक्याच्या पोह्यांचा चिवडा पाहणार आहोत. साहित्य: ७ कप कॉर्न फ्लेक्स (Plain) (टीप ३,४ पहा) १/४ कप तेल […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. दिवाळी स्पेशल- मक्याचा चिवडा InShorts Marathi.

]]>

चिवडा हा असा पदार्थ आहे जो वर्षभर खाल्ला जातो. त्यामुळे दिवाळी व्यतिरिक्त चिवडा वर्षभर केला जातो. चिवड्याचे अनेक प्रकार बनविले जातात. जसे की मूरमुरे चिवडा, पातळ पोहे चिवडा, किवा भडंग चिवडा. असे अनेक प्रकार केले जातात आज आपण मक्याच्या पोह्यांचा चिवडा पाहणार आहोत.

साहित्य:
७ कप कॉर्न फ्लेक्स (Plain) (टीप ३,४ पहा)
१/४ कप तेल
फोडणीसाठी: १/२ टिस्पून मोहोरी, १/२ टिस्पून जिरे, १/४ टिस्पून हिंग, १/२ टिस्पून हळद, १ टिस्पून लाल तिखट, ६-७ पाने कढीपत्ता
६-७ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
२/३ कप शेंगदाणे
१/४ कप बेदाणे
२ टिस्पून धणे-जिरे पूड
१ टेस्पून आमचूर पावडर
मिठ आणि साखर चवीनुसार

कृती:
१) मोठ्या पातेल्यात १/४ कप तेल गरम करावे. त्यात शेंगदाणे फ्राय करून घ्यावे. शेंगदाणे एका ताटलीत काढून ठेवावेत.
२) आच मध्यम करावी. गरम तेलात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट आणि हिरव्या मिरच्या घालून फोडणी करून घ्यावी. कढीपत्ता घालून तडतडू द्यावा. बेदाणे घालावेत काही सेकंद परतून शेंगदाणे आणि कॉर्नफ्लेक्स घालावेत. कॉर्नफ्लेक्स ६-७ भागात घालावेत. एकदम घालू नयेत, जेणेकरून तेल सर्व कॉर्नफ्लेक्सना लागेल.
३) गॅस एकदम मंद ठेवून चिवडा निट मिक्स करून घ्यावा. आता धणे-जिरेपूड, आमचूर पावडर, मिठ आणि साखर (मी ३ टिस्पून साखर वापरली होती) घालून मिक्स करावे.
जर नॉनस्टिक भांडे वापरत असाल आणि भांड्याला कान असतील तर दोन्ही कान पकडून चिवडा सांडू न देता सावकाशपणे पाखडावा. म्हणजे सर्व जिन्नस छान मिक्स होतील.
४) गॅस बंद करून चिवडा निवू द्यावा. चिवडा निवला कि हवाबंद डब्यात भरून ठेवावा.

मक्याचा चिवडा
मक्याचा चिवडा

टीप:
१) शेंगदाण्याप्रमाणेच सुक्या खोबर्या्चे पातळ काप आणि चण्याचे डाळं तळून चिवड्यात वापरू शकतो.
२) जर मिरच्या वापरायच्या नसतील तर फक्त लाल तिखट वापरू शकतो.
३) काही सिरीयल्स (cereal) पातळ तर काही जरा जाड असतात (मी आणलेल्या सिरीयल्स पातळ होत्या). त्यावरती तेल किती लागेल हे अवलंबून असते, म्हणून एकावेळी सर्व सिरीयल्स तेलात न घालता एकेक कप घालावेत.
४) सिरीयल्समध्ये साखरेचे प्रमाण कमीतकमी असावे, तेव्हा सिरीयल (cereal) निवडताना खोक्यावर ’Nutrition Label’ वर साखरेचे प्रमाण बघुन घ्यावे. शुगर फ्रोस्टेड सिरीयल्स (Sugar Frosted Cereals) वापरू नयेत. त्यामुळे चिवडा खुप गोड होईल.

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. दिवाळी स्पेशल- मक्याचा चिवडा InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/update-corn-flakes-chivda-recipe-diwali/feed/ 0 11525
दिवाळी स्पेशल – गोड शंकरपाळे https://inshortsmarathi.com/diwali-special-sweet-god-shankarpaale-updated/ https://inshortsmarathi.com/diwali-special-sweet-god-shankarpaale-updated/#respond Wed, 18 Oct 2017 05:40:04 +0000 http://maharashtradesha.com/?p=11707

गोड शंकरपाळे- शंकरपाळे हा असा पदार्थ आहे जो दिवाळीच्या फराळातील अत्यंत महत्त्वाचा आहे. शंकरपाळ्याचे मुख्य दोन प्रकार पडतात एक गोड शंकरपाळे व दुसरे खारे किवां तिखट मिठाचे शंकरपाळे. शंकरपाळे हा पदार्थ चहा सोबत देखील खाता येतो. याबरोबर साखर असल्यामुळे ते अनेक दिवस टिकू शकतात. जाणून घ्या गोड शंकर पाळ्याची रेसिपी. साहित्य: १/४ कप दूध १/४ […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. दिवाळी स्पेशल – गोड शंकरपाळे InShorts Marathi.

]]>

गोड शंकरपाळे- शंकरपाळे हा असा पदार्थ आहे जो दिवाळीच्या फराळातील अत्यंत महत्त्वाचा आहे. शंकरपाळ्याचे मुख्य दोन प्रकार पडतात एक गोड शंकरपाळे व दुसरे खारे किवां तिखट मिठाचे शंकरपाळे. शंकरपाळे हा पदार्थ चहा सोबत देखील खाता येतो. याबरोबर साखर असल्यामुळे ते अनेक दिवस टिकू शकतात. जाणून घ्या गोड शंकर पाळ्याची रेसिपी.
साहित्य:
१/४ कप दूध
१/४ कप तूप
१/४ कप साखर
साधारण दिड कप मैदा

कृती:
१) दूध आणि साखर एकत्र करून साखर वितळेपर्यंत गॅसवर गरम करावे. (महत्त्वाची टिप खाली नक्की वाचा) हे मिश्रण कोमट करून घ्यावे.
२) या मिश्रणात तूप गरम करून त्याचे मोहन मैद्यामध्ये घालावे. मिक्स करून कोमट दुध घालून मैदा भिजवावा. भिजवलेला मैदा एकदम घट्ट किंवा एकदम सैल मळू नये. मध्यमसर मळावे. मळलेले पिठ २० मिनीटे झाकून ठेवावे.

३) २० मिनीटांनंतर पिठ परत एकदा मळून घ्यावे. २ इंचाचा एक गोळा करून थोडा मैदा भुरभुरवून लाटावे. कातणाने त्याचे शंकरपाळे पाडावेत. आणि तूपात किंवा तेलात सोनेरी रंगावर तळून काढावेत.

टीपा:
१) दुध आणि तूप एकत्र केल्यास काहीवेळा फाटते. म्हणून साखर आणि दुध गरम करून कोमट करावे. तूप निराळे गरम करून त्याचे मोहन मैद्यामध्ये घालावे.
२) अमेरिकेत दुध, तूप आणि साखर एकत्र उकळवून मी शंकरपाळे केले होते तेव्हा कधी दुध फाटले नव्हते. बहुदा ते प्रोसेस्ड असल्यामुळे असेल. पण भारतात दुध अन्प्रोसेस्ड असल्यास दुध आणि तूप एकत्र गरम केल्यावर ते काहीवेळा फाटू शकते.
२) दुधाऐवजी पाणी वापरले तरी चालेल. पाणी वापरल्यास पाणी, तूप आणि साखर एकत्र करून गरम करावे. साखर वितळली कि मिश्रण कोमट होवू द्यावे आणि मग मैद्यात घालून भिजवावे.

shankar pale, sweet dish,diwali speical,sweet dish
गोड शंकरपाळे

 

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. दिवाळी स्पेशल – गोड शंकरपाळे InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/diwali-special-sweet-god-shankarpaale-updated/feed/ 0 11707
दिवाळी स्पेशल- अनारसे https://inshortsmarathi.com/diwali-speical-anarse-diwali-faral-recipe/ https://inshortsmarathi.com/diwali-speical-anarse-diwali-faral-recipe/#respond Wed, 18 Oct 2017 05:39:25 +0000 http://maharashtradesha.com/?p=11408

अनारसे दिवाळीचा फराळ बनविताना ७० % महिलांचा एक पदार्थ हमखास चुकतो. तो म्हणजे अनारसे. अनारसे असा पदार्थ आहे जो एकदा का जमला की खूप भारी जमतो. पण एकदा का फसला की पुन्हा जमने थोडे मुश्कीलच. आज अशाच नेहमी फसणाऱ्या अनारसे या पदार्थाची रेसिपी आपण पाहणार आहोत. साहित्य: १ कप तांदूळ १ कप किसलेला गूळ १ […]

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. दिवाळी स्पेशल- अनारसे InShorts Marathi.

]]>

अनारसे
दिवाळीचा फराळ बनविताना ७० % महिलांचा एक पदार्थ हमखास चुकतो. तो म्हणजे अनारसे. अनारसे असा पदार्थ आहे जो एकदा का जमला की खूप भारी जमतो. पण एकदा का फसला की पुन्हा जमने थोडे मुश्कीलच. आज अशाच नेहमी फसणाऱ्या अनारसे या पदार्थाची रेसिपी आपण पाहणार आहोत.
साहित्य:
१ कप तांदूळ
१ कप किसलेला गूळ
१ चमचा तूप
खसखस
तळण्यासाठी तूप / तेल

अनारसे
अनारसे

कृती:
१) तांदूळ ३ दिवस पाण्यात भिजवावेत. प्रत्येक दिवशी पाणी बदलावे.
२) चौथ्या दिवशी चाळणीत पाघळत ठेवावे. पंच्यावर घालून कोरडे करून घ्यावेत. मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यावे नंतर बारीक चाळणीमधून चाळून घ्यावे.
३) किसलेला गूळ आणि १ चमचा तूप चाळलेल्या बारीक तांदूळात घालून मळावे. घट्ट मळलेला गोळा ५-६ दिवस डब्यात भरून ठेवावा. स्टिलचा डबा वापरू नये शक्यतो प्लास्टिकचा डबा वापरावा किंवा प्लास्टिक पिशवीत भरून प्लास्टिकच्या हवाबंद डब्यात ठेवावे.
४) ५-६ दिवसांनी हे पिठ बाहेर काढावे. तळण्यासाठी मध्यम आचेवर तेल / तूप गरम करावे. २-३ सुपारीएवढे गोळे करावे. पुरीसारखे लाटावे. लाटताना खसखशीवर लाटावी. हि पुरी तळताना खसखस असलेला भाग वरती ठेवावा आणि तळताना पुरीची बाजू पलटू नये, नाहीतर खसखस जळू शकते.
५) पुरी तेलात टाकल्यावर फुलते व थोडी पसरट होते त्यामुळे झारा आणि एक स्टीलचा चमचा तेलातील पुरीच्या कडेने धरावा म्हणजे पुरी तुटणार नाही व गोल राहिल.
६) अनारसे तळताना बयाम्ह चदा तो फसफसतो (हसतो). तेव्हा पिठाचा गोळा तसाच ठेवून द्यावा, नंतर वापरावा कारण हे पिठ ५-६ महिने सहज टिकते.
७) अनारसे मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून काढावेत. चाळणीत उभे करून तेल निथळून जाऊ द्यावे

Related posts

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. दिवाळी स्पेशल- अनारसे InShorts Marathi.

]]>
https://inshortsmarathi.com/diwali-speical-anarse-diwali-faral-recipe/feed/ 0 11408