InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

लोकसभा निवडणुकीत यंदा तब्बत 67.1 टक्के मतदान; मतदानाचा टक्का वाढला

सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आटोपून आता निकालाची वेळ आली आहे. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्येही मतदारांचा भरपूर उत्साह दिसून आला असून, सात टप्प्यात झालेल्या मतदानामध्ये तब्बल 67.1 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. गेल्यावेळच्या मतदानापेक्षा मतदानाचा टक्का यावेळी वाढला आहे.

2004 मध्ये 57.19 टक्के, 2009 मध्ये 58.19 टक्के आणि 2014 मध्ये 66.44 टक्के मतदान झाले होते.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत 543 जागांसाठी 66.44 टक्के मतदान झाले होते. त्यापेक्षा यावेळी अधिक मतदान झाले आहे. गेल्या 16 लोकसभा निवडणुकांचा आढावा घेतल्यास मतदानाच्या टक्केवारीमध्ये सातत्याने चढउतार होत असल्याचे दिसून येते.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.