ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

राज्यात सर्वदूर पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला असून जनजीवन पूर्ण कोलमडले आहे., , , , , रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजेच आज या 6 अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे.

या ठिकाणी 204 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. यासोबतच मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही भागात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.या ठिकाणी 65 ते 200 मिमीच्या दरम्यान पाऊस पडू शकतो.

महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 ऑगस्टपर्यंत दमदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यांसह धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, सांगली, सोलापूरात पुढचे 4 दिवस हलक्या सरी बरसतील. तसंच संपूर्ण मराठवाड्यातही 4 दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस राहिल.

महत्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.