Redmi Mobile Launch | लवकरच लाँच होणार Redmi Note 12 5G, जाणून घ्या फीचर्स

Redmi Mobile Launch | टीम महाराष्ट्र देशा: चिनी मोबाईल उत्पादक कंपनी Xiaomi नेहमी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स बाजारात मोबाईल लाँच (Mobile Launch) करत असते. कंपनी लवकरच Redmi Note 12 सिरीज लाँच करणार आहे. कंपनी या सिरीजअंतर्गत तीन स्मार्टफोन बाजारात घेऊन येणार आहे. यामध्ये Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro 5G आणि Redmi Note 12 Pro Plus 5G यांचा समावेश आहे. कंपनीने नुकतीच या सिरीजची लॉन्चिंग तारीख जाहीर केली आहे. हे तिन्ही नवीन मोबाईल नवीन वर्षात बाजारात लाँच होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे स्मार्टफोन 5 जानेवारीला लाँच होऊ शकतात. तर, या स्मार्टफोनचा सेल 11 जानेवारीपासून सुरू होऊ शकतो.

Redmi Note 12 5G फीचर्स

Redmi Note 12 5G हा स्मार्टफोन बाजारामध्ये 120hz च्या रिफ्रेश रेटसह येणार असून, यामध्ये 6.67 इंच HD Plus AMOLED डिस्प्ले उपलब्ध आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 4 Gen SoC प्रोसेसर देण्यात आलेले आहे. या फोनच्या स्टोरेजबद्दल बोलायचे झाले, तर यामध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहेत. त्याचबरोबर या मोबाईलमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आलेली आहे. हा स्मार्टफोन भारतीय बाजारमध्ये 20,000 रुपयांपर्यंत लाँच होऊ शकतो.

Redmi Note 12 Pro Plus 5G

Redmi Note 12 Pro Plus 5G या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच HD OLED डिस्प्ले उपलब्ध आहे. जो 120hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन बाजारामध्ये तीन स्टोरेज पर्यायांसह लाँच केला जाऊ शकतो. यामध्ये 6/128GB, 8/265GB आणि 12/128GB यांचा समावेश असू शकतो. या मोबाईलची किंमत स्टोरेज नुसार ठेवण्यात आलेली आहे. त्यांची किंमत अनुक्रमे 24,999, 26,999 आणि 28,999 रुपयांपर्यंत असू शकते. हे स्मार्टफोन फ्लिपकार्टवर उपलब्ध असतील.

कंपनीने चीनमध्ये Redmi Note 12 Pro सिरीज आधीच लाँच केली आहे. कंपनी आता ही सिरीज भारतामध्ये लाँच करणार आहे. ऑक्टोबर महिन्यात चीनमध्ये ही सिरीज लाँच करण्यात आली होती. चीनमध्ये त्याची किंमत 2099 युआन म्हणजेच सुमारे 23,000 रुपये होती.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.