Redmi Mobile | Redmi चा ‘हा’ मोबाईल झाला भारतात लाँच

टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये सध्या फेस्टिव सीजन सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक कंपनी आपले नवनवीन प्रोडक्ट्स बाजारामध्ये लाँच करत आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत Redmi ने आपला नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. Redmi ने आपला Redmi A1 + लाँच केला आहे. Xiaomi ने या वर्षी लाँच केलेल्या अल्ट्रा बजेट फोनचे हे अपडेटेड मॉडेल म्हणून Redmi ने हा फोन बाजारात आणला आहे. Redmi च्या या अल्ट्रा बजेट फोनमध्ये 5000mAh बॅटरीसह 6.52inch HD+LCD डिस्प्ले उपलब्ध आहे. मेड इन इंडिया आणि मेड फॉर इंडियासह Redmi आपल्या या नवीन फोनची जाहिरात करत आहे.

Redmi A+1 फीचर्स

Redmi A+1 दोन प्रकारच्या स्टोअरेज सह बाजारामध्ये उपलब्ध आहे. 2GB RAM + 32GB आणि 3GB RAM + 32GB पर्याय उपलब्ध आहेत. या फोनमध्ये 6.52 inch HD+LCD डिस्प्ले आहे. Redmi चा हा नवीन स्मार्टफोन MediaTek Helio A22 प्रोसेसर सह सुसज्ज आहे. या फोनला 3GB LPDDR4X RAM आणि 32GB पर्यंत eMMC 5.1 स्टोरेज उपलब्ध आहे. फोनची बॅटरी बद्दल सांगायचे झाले तर यामध्ये 5000mAh आणि 10W मायक्रो USB चार्जिंग फीचर उपलब्ध आहे.

Redmi A+1 कॅमेरा

Redmi च्या या नवीन मॉडेल मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. याचा फ्रंट कॅमेरा 8MP असून यामध्ये QVGA सेन्सर देण्यात आलेला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 5MP कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये रियल माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि लेदर फिनिशिंगसह बॅक पॅनल उपलब्ध आहे.

Redmi A+1 किंमत

Redmi च्या Redmi A+1 या स्मार्ट फोनची किंमत 7,499 रुपयांपासून सुरू होत आहे. या फोनच्या टॉप मॉडेल ची किंमत 8,499 रुपये आहे. या फोनचा सेल 17 ऑक्टोबर 2022 पासून दुपारी 12 वाजेनंतर Mi.com आणि Flipkart वर सुरू होईल.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.