Reels | खोट्या बंदुकीसोबत रिल्स बनवणे पडेल महागात; होऊ शकते ५ वर्षाची शिक्षा

टीम महाराष्ट्र देशा: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये दिवसेंदिवस सोशल मीडिया (Social Media) ची क्रेझ वाढत चालली आहे. फेसबुक (Facebook), इंस्टाग्राम (Instagram), यूट्यूब (YouTube) इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युवा पिढी हमखास सक्रिय असते. कारण आजकाल सोशल मीडियाचा वापर फक्त मनोरंजनासाठी नाही तर संपर्कासाठी देखील केला जातो. त्याचबरोबर इंस्टाग्राम रिल्स (Instagram Reels) आणि युट्युब शॉट्स (YouTube Shorts) अधिक लोकप्रिय होत चालले आहेत.

दरम्यान, रिल्स बनवणे हे सर्वात लोकप्रिय झाले आहे. यामध्ये कधी मनोरंजक व्हिडिओ असतात तर कधी दहशत गाजवणारे व्हिडिओ देखील बनवले जातात. अनेकदा हे रिल्स बनवताना हिंसक दृश्य समोर येतात. बंदूक,चाकू, तलवार इत्यादी गोष्टी वापरून अनेकदा हे व्हिडिओ शूट करून पोस्ट केले जातात. अशा प्रकारचे व्हिडिओ बनवल्यावर दहशतीचे वातावरण निर्माण होते. अशा परिस्थितीमध्ये व्हिडिओमध्ये खोट्या बंदुकीचा आधार घेतला आणि समोरील पाहणाऱ्या व्यक्तीने तुमच्या विरोधात आक्षेप घेतला तर व्हिडिओ बनवणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते.

अशा परिस्थितीमध्ये व्हिडिओ बघणारा व्यक्ती तुमच्यावर भारतीय दंड संहिता कलम 505 अंतर्गत गुन्हा दाखल करू शकतो. तर व्हिडिओ बनवणाऱ्याला याअंतर्गत किमान पाच वर्ष करावासाची शिक्षा भोगावी लागू शकते. दरम्यान, सोशल मीडियावर अशा प्रकारचे अनावश्यक व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी सायबर गुन्हे देखील दाखल होतात. त्याचबरोबर व्हिडिओ बनवणारा खोट्या बंदुकीचा वापर करत असला तरी तो दोषी समजला जातो.

सध्या मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हे वाढत आहेत. त्यात रिल्स बनवणारांचे प्रमाण अधिक आहे. या अशाच कारणांमुळे काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने टिक टाॅक सारख्या रिल्स अॅपवर बंदी घातली होती. पण आता इन्स्टाग्रामवर रिल्सचा पर्याय असल्याने वापरकर्ते इन्स्टाग्रामचा वापर करत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.