InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

आदित्य ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख, वरळीत शुभेच्छांचे पोस्टर

वरळीमध्ये भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत आदित्य ठाकरेंचे पोस्टर लावण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यामध्ये युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे विजयी झाले आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीमुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये वरळी मतदारसंघाकडे राज्यात सर्वांचं लक्ष लागले होते. अखेर ठाकरे कुटुंबीयातील पहिल्या ठाकरेंनी निवडणूक लढवत दणदणीत विजय मिळवला आहे.

‘ठाकरे’ घराण्यातील पहिल्या ठाकरेंनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. यामुळे या मतदार संघाकडे सर्वांचं लक्ष होतं. आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार असल्याचे कळाल्यापासून हा मतदारसंघाने लक्ष वेधून घेतले होते. आदित्य ठाकरेंमुळे शिवसेनेने या मतदारसंघात चांगला जोर लावला लावण्यात आला होता. आता आदित्य ठाकरे विजयी झाले आहेत.

Loading...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघामधून आदित्य ठाकरेंना 89,248 मते मिळाली. तर त्यांच्याविरोधातील काँग्रेसचे उमेदवार अॅड. सुरेश माने यांना 21,821आणि बिगबॉस फेम अभिजीत बिचुकले यांना 781 मतं मिळाली. आदित्य ठाकरे यांच्या विजयानंतर आता वरळीमध्ये आदित्य ठाकरे हे भावी मुख्यमंत्री आहेत, अशा आशयाचे बॅनर्स झळकू लागले आहेत.

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.