Refinery Project | रत्नागिरी : सध्या कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. तर हा प्रकल्प भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर तालुक्यात क्रूड ऑईल रिफायनिंग करणारी ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल उदयोग’ प्रस्तावित होणार आहे. महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे हा प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ, धोपेश्वर तसचं नाटे या परिसरात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर आता या सर्वेक्षणाविरोधातील स्थानिकांनी आंदोलन सुरू केलं आहे. आजचा दुसरा दिवस असून आंदोलनकर्ते आपल्या मतावर ठाम आहेत. राजापूरमधील एका महिलेने ‘जीव गेला तरी इथेच थांबेन’ असा इशारा दिला आहे. तर विरोधकांकडून देखील याला विरोध होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. तर या प्रकल्पामुळे तेथील लोकांना रोजगार उपलब्ध होतील असं सरकारच मत आहे.
रिफायनरीला हद्दपार करण्यासाठी स्थानिकांचे आंदोलन (Locals protest to evict refinery)
तसचं कोकणातील प्रस्तावित रिफायनरीला हद्दपार करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू सोलगाव येथे हजारो स्थानिकांचे आंदोलन सुरु आहे. तर सोमवार पासून (24 एप्रिल) या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली असून पोलिसांनी विरोध करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. आंदोलन करणाऱ्या २५ महिलांना पोलिसांनी अटक देखील केली आहे. तसचं, मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या महिलांवर सौम्य लाठीचार्ज केला आल्याने आंदोलन अजूनच चिंगळलं आहे.
दरम्यान, स्थानिक लोकांची भूमिका स्पष्ट असून कोकण निसर्गसौंदर्याने नटलेले आहे याठिकाणी आंबा, काजू नारळ, सुपारीच्या बागा टिकल्या पाहिजेत. याशिवाय येथील रहिवाशांचा रोजगार मासेमारी हा असल्याने या तेलशुद्धीकरणाच्या प्रकल्पांमुळे समुद्रात गरम पाणी तसचं आणखी काही घटकांच्या विसर्गामुळे मासे मरतील व जैवविविधतेवर धोका निर्माण होऊन त्याचा रोजगारावर परिणाम होईल. मासेमारी करणाऱ्या लोकांकडे उदरनिर्वाह करण्याचा हा एकच पर्याय आहे असं देखील त्याच मत आहे. यामुळे ऊर्जा, पेट्रोलियम, तेलशुद्धीकरणाच्या प्रकल्पांना स्थानिक विरोध करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Ajit Pawar | “दिवसा मतदान करा, यात्रा-जत्रा रात्री, तमाशा बघायचा तो रात्री बघा, त्या गौतमी पाटील बाईला बोलवा” : अजित पवार
- Department Of Agriculture | कृषी विभागामार्फत बंपर भरती! जाणून घ्या सविस्तर
- Ravindra Dhangekar | “…म्हणून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचा माझ्यावर राग आहे” : रवींद्र धंगेकर
- Zila Parishad | जिल्हा परिषद, अहमदनगर यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती सुरू
- Job Opportunity | केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभागात नोकरीची संधी! आजच करा अर्ज