ईव्हीएम हॅक करण्यासाठी भाजपला ‘जिओ’ने पुरविले सिग्नल

‘इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र ‘हॅक’ करण्यासाठी ‘रिलायन्स जिओ’ने भाजपला कमी तरंगलांबीचे ‘सिग्नल’ पुरवले. भाजपचे प्रयत्न आमच्या ‘टीम’ने हाणून पाडले नसते तर राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणूकही भाजपने जिंकली असती,’ असा दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर तज्ज्ञाने केला आहे.

“फक्त भाजपच नाही तर इतर पक्षांनाही ईव्हीएम गैरव्यवहार कसा करतात हे ठाऊक आहे,” असा दावा करून शुजा म्हणाला, दिल्लीमधल्या २०१५ मधल्या निवडणुकांतही घोळ होणार होता, परंतु आम्ही वेळीच दुर्घटना रोखली आणि आपनं ७० पैकी ६७ जागा जिंकल्या अन्यथा भाजपानं निवडणुका जिंकल्या असत्या असं शुजानं म्हटलं आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुका या आधीच फिक्स झाल्या होत्या आणि गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू नवी दिल्लीमध्ये कार अपघातात झाला नव्हता असा  खळबळजनक दावा शुजाने केला आहे. आपल्याकडे हॅकिंग कसं झालं याचे पुरावे असून; मतदान यंत्रे हॅक कशी करता येतील हे दाखवू शकतो असेही त्यानं सांगितले. ईव्हीएम डिझाईन केलेल्या टीममध्ये आपण होतो असा दावा  शुजाने केला आहे.

शुजाने ‘स्काइप’द्वारे लंडन येथे पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएमबाबत अनेक खळबळजनक दावे केले आहेत. माझ्या सहकाऱ्यांवर हल्ले झाले होते. काही सहकाऱ्यांचे खून झाल्यानंतर घाबरून जाऊन मी २०१४ मध्ये परदेशात पळून गेलो असे शुजाने सांगितले.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.