InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

1500 रुपयांहून कमी किंमतीचा 4G स्मार्टफोन लॉन्च करणार?

सप्टेंबरमध्ये जिओने फ्रीमध्ये व्हॉईस कॉलिंग आणि डेटाची ऑफर आणली होती. ही ऑफर सुरु झाल्यानंतर हातोहात जिओचे सिम विकले गेले. सुरुवातीला ही ऑफर डिसेंबरपर्यंत होती. मात्र प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता ही ऑफर मार्चपर्यंत वाढवण्यात आलीये.

त्यामुळे रिलायन्स जिओच्या नव्या कमी किंमतीतील स्मार्टफोनला यूझर पसंती दर्शवतील अशी आशा व्यक्त केली जातेय. यामुळे इतर स्मार्टफोन कंपन्यांसाठी मोठी स्पर्धाही निर्माण होईल.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रिलायन्स जिओ इन्फोकॉमने फ्री अनलिमिटेड इंटरनेट डेटा आणि मोबाईल कॉलिंगची सुविधा अत्यंत लोकप्रिय ठरली होती आणि अजूनही लोकप्रिय ठरते आहे. जिओची सुविधा 31 डिसेंबर 2016 पासून आणखी तीन महिने वाढवून 31 मार्च 2017 पर्यंच वाढवण्यात आली आहे.

जिओच्या माध्यमातून टेलिकॉम क्षेत्रात धडाकेबाज एन्ट्री केल्यानंतर आता स्मार्टफोन बाजारातही दमदार एन्ट्री करण्याच्या विचारात रिलायन्स जिओ इन्फोकॉम असल्याचे दिसते आहे.

काही अंदाजे आकडेवारीनुसार, भारतात आजही 65 टक्के लोक फीचर फोनचा वापर करतात. त्यामुळे रिलायन्सने 1500 रुपयांहून कमी किंमतीचा स्मार्टफोन आणला, तर नक्कीच स्मार्टफोन बाजारात जिओसारखीच क्रांती होईल

2017 च्या या पहिल्या तीन महिन्यातच रिलायन्स जिओ इन्फोकॉम आपला कमी किंमतीचा स्मार्टफोन बाजारात उतरवू शकते. या फोनमध्ये फ्रंट आणि रिअर कॅमेरा, लाईव्ह टीव्ही, जिओ चॅट अशा सुविधा असतील

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.