InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

रिलायन्स जिओची नवीन वर्षात खास सर्व्हिस…

आगामी वर्ष जिओ ग्राहकांसाठी धमाकेदार असणार आहे. कारण रिलायन्स जियो येत्या २०१९ मध्ये फक्त गीगा फायबर सेवेची सुरुवात करणार नाही, तर VoWi-Fi सेवा सुरु करणार आहे. VoWi-Fi या सर्व्हिसमुळे ग्राहक नेटवर्क नसताना सुद्धा कॉल करु शकणार आहेत.

आगामी काळात पब्लिक VoWi-Fi सर्व्हिस लाँच करणार, अशी घोषणा रिलायन्सजिओने गेल्या काही दिवसांपूर्वी केली आहे.सध्या रिलायन्स जिओ सध्या मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगना आणि केरळमध्ये या सर्व्हिसची चाचणी घेत आहे. VoWi-Fi च्या मदतीने ग्राहक सेलुलर कनेक्टिव्हिटीशिवाय व्हॉइस कॉल करु शकतील.

Loading...

रिलायन्स जिओने  गीगा फायबर हाय स्पीड ब्रॉडबँड सर्व्हिसला नवीन वर्षात लाँच करण्याची शक्यता आहे. ही सर्व्हिस घेण्यासाठी ग्राहकांना Jio.com वर लॉग इन करावे लागणार आहे. याशिवाय जिओ अॅपवर सुद्धा या सर्व्हिससाठी ग्राहक रजिस्ट्रेशन करु शकतात. रजिस्ट्रेशनसाठी अद्याप कोणतीही फी आकारली जात नाही आहे.

महत्वाच्या बातम्या –

- Advertisement -

 

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.