पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा, पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ

पीएमसी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. आरबीआयकडून नुकतंच याबाबतचं पत्रक काढण्यात आलं आहे. आरबीआयने पंजाब महाराष्ट्र बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध टाकल्याने ग्राहकांना पैसे काढण्यास कठीण जात  होते. मात्र आता ही पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या नव्या पत्रकानुसार, आता पीएमसी बँकेतील ग्राहकांना 40 हजार रुपये काढता येणार आहे. सध्या ही मर्यादा 25 हजार आहे. आर्थिक अनियमितता आढळल्याने आरबीआयने या बँकावर निर्बंध लागू केले होते.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांची नुकतीचं भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी ग्राहकांच्या सर्व अडचणी दूर करा, अशी विनंती केली होती. त्यावर शक्तीकांत दास यांनीही ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यात येईल असं आश्वासन दिलं  होतं.

Loading...

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.