“शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षात ठेवा; संजय राऊतांच जोरदार प्रत्युत्तर 

मुंबई : शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं?, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. याला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

अहो! शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षात ठेवा. पाटील यांना असले सुंदर विचार सुचतातच कसे?, याचा तपास केला पाहिजे, असं म्हणत राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार निशाणा साधला.

“संयुक्त महाराष्ट्रानंतर मुंबई केंद्रशासित प्रदेश होणार वा महाराष्ट्राच्या हातून निसटणार, असे प्रसंग उभे झाले होते. पण शिवसेनेने बाणेदारपणे मुंबई महाराष्ट्रात ठेवली. चंद्रकांत पाटलांसारखी माणसे मुंबईत येऊन आज जाहीरपणे बोलू शकतात, शिवसेना नसती तर तेही शक्य झालं नसतं,” असं राऊत म्हणाले.

“शिवसेनेने मुंबई महाराष्ट्रात ठेवली अन् मुंबईवर मराठी माणसाचा पगडा कायम ठेवला. चंद्रकांत पाटलांचे ब्रिटिशांवर फारच प्रेम दिसते. त्यांना जाऊन बराच काळ झाला. शिवसेनेने मुंबईसाठी काय केले, हे जरा महाराष्ट्रात जाऊन जनतेला विचारा. वाटल्यास या विषयावर सार्वमत घ्या,” असं संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा