अध्यादेश काढा अन्यथा परिणाम भोगा ; मराठा आरक्षणावरुन उदयनराजे संतापले

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळे समाजाच्या प्रगतीला मोठी खिळ बसली आहे, असं भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं. उदयनराजेंनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला विश्वासात घेऊन, आवश्यक कार्यवाही केली असती, तर आज मराठा आरक्षण टिकवता आले असते, असं उदयनराजे म्हणाले.

 

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण प्रकरण खंडपीठाकडे पाठवून, सध्या लागू असलेल्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात मराठा समाजात असंतोष उफाळला आहे.यादरम्यान उदयनराजे भोसले यांनी फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहून, मराठा आरक्षणाबाबत आपलं म्हणणं मांडलं.

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा