मोदींच्या जागी ‘सलमान खान’ किंवा ‘सोनू सूद’ यांना पंतप्रधान करा; राखी सावंत 

मुंबई: “काम करणं जमत नसेल त निवृत्ती घ्या, आम्हाला तुमची टीव्हीवरील भाषणं नको आहेत, मदत हवी आहे. “सोनू सूद किंवा सलमान खान यांना कृपया देशाचे पंतप्रधान करा. कारण खरे हिरो तर तेच आहेत. बाकीचे सर्व भाषणं ठोकण्यात व्यस्त आहेत.” असा जोरदार टोला अभिनेत्री राखी सावंत हिनं केंद्र सरकारवर लगावला आहे.

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळं रुग्णालयात औषधं, बेड, लसी यांची कमतरता जावणत आहे. मात्र याही परिस्थितीत आपले नेते लोकांची मदत करण्याऐवजी भाषणं ठोकत फिरतायेत असा आरोप राखी सावतं हिनं केला आहे. लोकांना आज मदतीची गरज आहे तुमच्या भाषणांची नाही. दिवसभर वाद-विवाद करत असता, उठसूठ भाषणं ठोकता आम्हाला आता वैगात आलाय तुमच्या या बोलबच्चनगीरीचा. आम्हाला खरीखुरी मदत हवी आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं देशातील सद्य परिस्थितीवर संताप व्यक्त केला.

“तुमच्यापेक्षा अधिक काम सलमान खान आणि सोनू सूद करताना दिसतायेत. खरे हिरो तर तेच आहेत. त्यांनाच या देशाचं पंतप्रधान करा.” कोरोनाच्या पार्श्वभूमीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखीने असे धारेवर धरलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा