InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पंकजा मुंडेंवर नवा आरोप, मोबाईल खरेदीमध्ये 106 कोटींचा घोटाळा

- Advertisement -

अंगणवाडी केंद्रावर सेविकांना देण्यात येणाऱ्या स्मार्टफोन मोबाईल खरेदीत महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी सुमारे सुमारे १०६ कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

पंकजा मुंडे मंत्री असलेल्या महिला व बाल कल्याण विभागाने राज्यातील ३० जिल्ह्यातील ८५ हजार ४५२ अंगणवाडी केंद्रासाठी मोबाईल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.  बंगळुरू मधील एमएस सिस्टेक आयटी सोल्युशन प्रा. लि. या कंपनीकडून पॅनासोनिक इलुगा १७ हा मोबाईल खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

बाजारातील रक्कमेपेक्षा 2000 रूपये प्रत्येक मोबाईलमागे अधिक दिले असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. तसेच विशेष म्हणजे, पॅनासोनिक इलुगा १७ हे मॉडेल एप्रिल २०१८ मध्ये लॉन्च करण्यात आले. मात्र, त्यानंतर त्याचे लागलीच उत्पादन थांबले. आता तर हा मोबाईल बाजारात उपलब्धच नाही. त्यामुळे एमएस सिस्टेक आयटी सोल्युशनने या मोबाईलची विक्री बेकायदेशीररित्याच केली असे म्हणावे लागेल असा आरोप देखील धनंजय मुंडे यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.