Reserve Bank India | रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी अधिसूचना जारी

Reserve Bank India | टीम महाराष्ट्र देशा: रिझर्व बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण आरबीआय यांच्यामार्फत रिक्त पदांची जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

रिझर्व बँक ऑफ इंडिया (Reserve Bank India) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 291 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये अधिकारी ग्रेड बी जनरल – 238 पदे, अधिकारी ग्रेड बी DEPR – 38 पदे, अधिकारी ग्रेड बी DSIM – 31 पदे भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Reserve Bank India) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

बँकेच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Reserve Bank India) पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार दिनांक 9 मे 2023 पासून दिनांक 9 जून  2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.rbi.org.in/

जाहिरात पाहा (View ad)

https://bit.ly/3AArN1C

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.