…. म्हणून रोशन कुटुंबाचा आदर करा – सुझान खान

गेल्या काही दिवसांपासून हृतिक रोशन व त्याची बहीण सुनैना यांच्यातील तणावाच्या चर्चा सुरू आहेत.  एका मुस्लीम तरुणाशी सुनैनाचे प्रेमसंबंध असल्याने कुटुंबीयांचा त्याला विरोध असल्याचं म्हटलं जातंय. या सर्व सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चा पाहता हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. ‘रोशन कुटुंबीयांसाठी ही फार कठीण वेळ आहे,’ असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.

‘सुनैना ही खूपच चांगली व्यक्ती आहे. ती सध्या वाईट परिस्थितीला सामोरं जात आहे. सुनैनाच्या वडिलांना आरोग्याच्या समस्या आहेत. या सर्व गोष्टींचा तिच्या आईवरही परिणाम झाला आहे. प्रत्येक कुटुंब अशा परिस्थितीतून कधी ना कधी जात असतं. तेव्हा तुम्ही या कुटुंबाचा आदर करा.’ असं सुझानने इन्स्टाग्रामवर लिहिलं.

 

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.