राज्यसभेचा बदला घेणार?; विधानपरिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली!

मुंबई : राज्यसभेच्या अनपेक्षित विजयानंतर आता भाजपचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. सहाव्या जागेसाठी झालेल्या लढतीत भाजपने सेनेचा पराभव करत विजय मिळवला. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्यानं निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे. भाजपचे ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

राज्यसभेतील पराभवानंतर आता विधान परिषदेसाठी आघाडीने कंबर कसली आहे. विधान परिषद निवडणुकीत आपल्याकडील मतांची फाटाफूट होऊ नये, यासाठी प्रत्येक पक्ष कामाला लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातून फोन गेले असून शनिवारपर्यंत (ता. १८ जून) मुंबईत पोहचण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

मात्र यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कमान हाती घेतली आहे. त्यादृष्टीने त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची विशेष बैठक घेतली आहे. या बैठकीत दहाव्या विधानपरिषदेच्या जागेवर भाजपचा पराभव करण्यासाठी ठाकरे यांनी आघाडीच्या नेत्यांसोबत विचारमंथन केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षांना त्यांच्या आमदारांना मुंबईत बोलावून सुरक्षित हॉटेल्समध्ये ठेवण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरुन घोडे बाजार टाळता येतील.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा