‘राणेंचा शिरच्छेद करणाऱ्याला ५१ लाखांचे बक्षीस’, विश्व हिंदू सेनेच्या अध्यक्षांचे वादग्रस्त विधान

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी भाष्य करताना अपशब्द वापरला आणि त्यानंतर झालेला गदारोळ संपूर्ण देशाने पाहिला. यानंतर शिवसेनेची उत्तर प्रदेशातील शाखा असलेल्या विश्व हिंदू सेनेच्या अध्यक्षाचे एक वादग्रस्त वक्तव्य समोर आल आहे. तीन महिन्यांपासून फरार असलेल्या अरुण पाठक याने ट्विटरवरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा शिरच्छेद करणाऱ्याला ५१ लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

तसेच राणे यांच्या अस्थी काशीमध्ये विसर्जित होऊ देणार नाही असेही त्याने म्हटले आहे. वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची वादग्रस्त पोस्टर्स चिकटवल्याप्रकरणी अरुण पाठक भेलूपूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यात वॉन्टेड आहे. पण अद्याप पोलीस त्याचा शोध घेऊ शकले नाहीत. यानंतर अरुण पाठकने ट्विटरवरुन हे वक्तव्य केलंय.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना बाळासाहेबांनी मोठे केलं आणि आता ते त्यांच्या मुलाविरोधात बोलत आहेत. असंही पथक म्हणाले. याअगोदरही त्यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. तर आता पुन्हा एकदा त्यांनी राणेंवरून वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय वाद उफळून आला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा